Farmer Success Story : शुगर फ्री निळा बटाटा उत्पादन; मंचर येथील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Ambegaon Pune News : मंचर येथील प्रगतिशील शेतकरी शांताराम थोरात यांनी शुगर- फ्री निळ्या बटाट्याच्या उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. मंचर परिसर प्रामुख्याने बटाट्याच्या शेतीसाठी ओळखला जातो
Farmer Success Story
Farmer Success StorySaam tv
Published On

मंचर (पुणे) : शेतात वेगवेगळे प्रयोग करत चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आता वाढ होत आहे. यामुळे शेतीतून चांगले उत्पादन घेऊन फायदा करून घेत आहेत. यातच मंचर येथील एका शेतकऱ्याने शेतात शुगर फ्री असलेल्या निळ्या बटाट्याची लागवड करण्याचा प्रयोग केला. शेतकऱ्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला असून यातून चांगले उत्पादन या शेतकऱ्याला मिळाले आहे.  

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील प्रगतिशील शेतकरी शांताराम थोरात यांनी शुगर- फ्री निळ्या बटाट्याच्या उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. मंचर परिसर प्रामुख्याने बटाट्याच्या शेतीसाठी ओळखला जातो. बहुतांश शेतकरी बटाट्याचे उत्पादन घेत असून येथील शेतकरी शांताराम थोरात यांनी स्थानिक कृषी तज्ज्ञांच्या मदतीने निळ्या बटाट्याच्या नव्या जातीवर संशोधन सुरू केले. त्यानुसार शेतात लागवड करण्याचा निर्णय घेतला. 

Farmer Success Story
Leopard Attack : पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याचा धुमाकूळ; १२ कोंबड्या फस्त, भंडाऱ्याच्या साकोलीतील घटना

कमी पाणी व सेंद्रिय खतांचा वापर 

हा प्रयोग शेतीतील नवसंशोधनाचा उत्तम नमुना आहे. शुगर-फ्री निळ्या बटाट्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात वेगळी ओळख मिळेल आणि ग्राहकांना पौष्टिक पर्याय उपलब्ध होईल. या बटाट्याच्या उत्पादनासाठी कमी पाणी आणि सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला. ज्यामुळे पर्यावरणपूरक शेतीलाही चालना मिळाली आहे. यशस्वी प्रयोगाची माहिती परिसरातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने कार्यशाळांचे आयोजन करण्याचे ठरवले असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. 

Farmer Success Story
Akola : गर्भाशयातून काढला १६ किलो मांसाचा गोळा; महिलेला मिळाले नवजीवन

मधुमेही रुग्णांसाठी बटाटा फायद्याचा 

निळ्या बटाट्याची ही खास जात केवळ रंगाने आकर्षक नाही, तर निळ्या बटाट्याची खासियत म्हणजे त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पारंपरिक बटाट्याच्या तुलनेत या जातीत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांचे प्रमाणही जास्त असल्याने त्याला बाजारात चांगली मागणी मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com