Leopard Attack : पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याचा धुमाकूळ; १२ कोंबड्या फस्त, भंडाऱ्याच्या साकोलीतील घटना

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याने प्रवेश करत कोंबड्यांवर हल्ला चढविला. यात १२ कोंड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
Leopard Attack
Leopard AttackSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: बिबट्याचा वस्ती परिसरात वावर वाढला असून मनुष्य व पशु- प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच भंडाऱ्याच्या साकोली येथील मोनो ऍग्रो इंडस्ट्रीजच्या बंदिस्त पोल्ट्री फार्ममध्ये रात्रीच्या सुमारास एका बिबट्याने प्रवेश केला. यानंतर कोंबड्यांवर झडप घालत १२ कोंबड्या फस्त केल्या आहेत. पोल्ट्री फॉर्ममधील बिबट्याचा संपूर्ण धुमाकूळ आणि थरार तिथं असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

वन्य प्राणी शिकारीच्या शोधात गाव, वस्ती परिसरात प्रवेश करत आहेत. प्रामुख्याने बिबट्याचा वावर अधिक प्रमाणात असून बिबट्याकडून हल्ले केले जात आहेत. अशातच भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याने प्रवेश करत कोंबड्यांवर हल्ला चढविला. यात १२ कोंड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना याठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

Leopard Attack
Nashik Crime : भयानक घटना; हॅप्पी होळी म्हणत अंगावर पेट्रोल टाकून पेटविले; सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

बंदोबस्ताची मागणी 

राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास अनेक नागरिक फिरायला जातात. त्याचं भागात असलेल्या या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्यानं धुमाकूळ घालून कोंबड्या फस्त केल्याची घटना घडल्यानं फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. वन विभागाने बिबट्या असो किंवा वन्यप्राणी यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

Leopard Attack
Badlapur : ब्लास्टिंगमुळे बदलापुर परिसरातील गावांना हादरे; घरांना गेले तडे, रहिवाशांनी आक्रमक होत दिला इशारा

बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा फडशा
पुणे : आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे बिबट्याने शेळीवर हल्ला करून फडशा पाडल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या अंधारात शिकारीच्या हेतुने काळुराम टाव्हरे यांच्या शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू झाला असुन बिबट्याच्या हल्ल्याच्या दहशतीमुळे १० शेळ्या भयभित झाल्याने इतरही शेळ्यांची प्रकृती खालावली असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भिती आहे. यामुळे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com