अक्षय गवळी
अकोला : महिलेच्या पोटात दुखत असल्याने तपासणीअंती गर्भाशयात मांसाचा गोळा असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी तब्बल २ तास शस्त्रक्रिया करून गर्भाशयातून तब्बल साडे सोळा किलो वजनाचा मांसाचा गोळा काढला आहे. यामुळे सदर महिला रुग्णाला नवजीवन मिळाले असून ट्यूमरचा आकार व वजनाची रेकॉर्ड बुकमध्ये नोंदणीसाठी पाठवणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
परभणी येथील एका ३२ वर्षीय महिलेच्या गर्भशयात गाठ तयार झाली होती. या गाठींमुळे महिला त्रस्त झाली होती. मागील दोन वर्षातच महिलेच्या गर्भशयात १६ किलो वजनाची गाठ तयार झाली. वारंवार पोट दुखणे, पोटाचा घेर वाढणे; यामुळे महिला त्रस्त झाली होती. या संदर्भात तिने उपचार घेतले. मात्र दुखणे बरे होऊ शकले नव्हते. यानंतर अकोल्यातल्या लक्ष्मीनारायण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये महिलेवर प्रसूती व स्त्री रोग तज्ञ डॉ. मुकेश राठी यांनी ही शस्त्रक्रिया केली.
महिला आई बनू शकणार
डॉ. राठी यांनी या रुग्ण महिलेच्या तपासण्या करून शस्त्रक्रियेची जटीलता जाणून घेत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेत महिलेच्या गर्भाशयातून १६.७५ किलो वजनाचा गोळा काढला. इतकेच नाही तर शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाशयाला वाचवण्यात यश आले आहे. यामुळे ती आई बनू शकणार आहे. आता या महिला रुग्णाचे चालणे, फिरणे, खाणे-पिणे सुरू झाले.
मासाचे नमुने तपासणीसाठी पाठविले
दरम्यान, अशा शस्त्रक्रिया व एवढे मोठे ट्यूमर क्वचितच आढळले असून या ट्यूमरचा आकार व वजनाची नोंदणी रेकॉर्ड बुकमध्ये करणार असल्याचे डॉ. राठी यांनी सांगितले. दरम्यान गाठ कशामुळे झाली याचे कारण अद्याप पर्यंत समजू शकलं नाही. तर मासाच्या काही नमुने वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.