Jalna News
Jalna Saam tv

Clash between Two Group : जालन्यात दोन गटांत तुफान राडा! डोकी फोडली, वाहनांच्या काचा फोडल्या; हॉस्पिटलबाहेर दगडफेक,VIDEO

two group Clash in Jalna : जालन्यात तुफान राडा झाला आहे. दोन गटाने वाहनांच्या काचा फोडल्या. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली.
Published on

अक्षय शिंदे पाटील, साम टीव्ही

जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. दोन गटात दगडफेक सुरु झाल्यानंतर परिसरात एकच तणाव निर्माण झाला. रस्त्यावरील नागरिक सैरावैरा पळू लागले. या दगफेकीत वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. तर काहींचे डोके फुटले आहेत. जालन्यात झालेल्या दगडफेकीत जवळपास ५ जण जखमी झाले आहेत. दगडफेकीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटात तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत दोन्ही गटातील जवळपास ५ जण जखमी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दगडफेकीनंतर जालन्यातील कदीम जालना पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jalna News
Ulhasnagar Clash : पाया सूपची गाडी लावण्यावरून राडा; दिव्यांग तरुणाला टोळक्याकडून मारहाण, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटातील दगडफेकीचं कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. दगडफेकीत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

Jalna News
Maharashtra Politics : ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; कोकणातील आणखी एका नेत्याने सोडली साथ

नेमकं काय घडलं?

जालना जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात दोन गटांमधील बाचाबाचीचे रुपांतर दगडफेकीत होऊन 6 जन जखमी झाले. कुटुंबातील जुन्या वादातून आपसापसातच ही दगडफेक झाल्याची माहिती मिळाली आहे. नातेवाईकाला भेटायला आलेल्या दोन कुटुंबात जुन्या वादातून शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर मारहाण करत एकमेकांवर दगडफेक सुरू झाली. या घटनेत ६ जण जखमी झालेत. पोलीस आल्यावर इतर आरोपी फरार झाले. या घटनेत ॲम्बुलन्सची काच फुटली असून दगडफेक करणाऱ्यांवर जालन्यातील कदीम पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com