Rahul Gandhi Rally In bihar  
लोकसभा २०२४

Loksabha Election: सरकार येताच एका महिन्यात तुमच्या बँक खात्यात टाकणार ८५०० रुपये: राहुल गांधींची घोषणा

Rahul Gandhi Rally : येत्या १ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या ७व्या अन् शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते जोमाने प्रचार करताहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी बिहारच्या अराह येथे जाहीर सभा घेतली.

Bharat Jadhav

अराहा: काँग्रेसची सरकार आल्यानंतर गरिबी आणि बेरोजगारी या समस्या सोडवेल. ४ जूनला इंडिया आघाडीचं सरकार येईल आणि त्यानंतर देशातील गरिबांची यादी तयार करत प्रत्येक कुटुंबातून एका महिलेचे नाव निवडून त्यांच्या खात्यात दरमहा ८५०० रुपये टाकले जातील, असा दावा राहुल गांधी यांनी आपल्या प्रचारसभेत केला. बिहारच्या अराह येथील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर एकाच महिन्यात गरिबांना पैसे दिले जातील,अशी घोषणा राहुल गांधींनी केलीय.

सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले इंडिया आघाडीसमोर दोन समस्या आहेत, एक श्रीमंत-गरिबीमधील दरी आणि दुसरी समस्या बेरोजगारी. देशात इंडिया आघाडीचं सरकार आलं तर काँग्रेस एकाच वेळी या दोन्ही समस्या सोडवणार असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. जून महिन्यात सरकार बनल्यानंतर देशातील गरिबांची यादी केली जाईल आणि प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेचं नाव निवडलं जाईल. अशा देशातील करोडो महिलांचे नावे काढले जातील आणि त्यांच्या बँक खात्यात दरमहा ८५०० रुपये टाकले जातील, याची सुरुवात येत्या ५ जुलैपासून केली जाईल.

या सभेपूर्वी त्यांनी भोजपूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी संविधान आणि अग्नीवीर योजना, जनगणनाच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना धारेवर धरले. राहुल गांधी म्हणाले "नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होणार नाहीत, हे निश्चित आहे. ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक असून भाजप जिंकला तर संविधान बदलून टाकेल.

मी जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला, तर नरेंद्र मोदी भारतात फक्त श्रीमंत आणि गरीब ह्याच दोन जाती आहेत. देशात फक्त २ जाती आहेत तर मोदी ओबीसी कसे झाले? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे आम्ही ठरवलंय इंडिया आघाडी सत्तेवर येताच आम्ही देशात जात जनगणना करू. नरेंद्र मोदींची अग्निवीर योजना रद्द करू. असं राहुल गांधी म्हणालेत"

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीदेखील भाजपवर जोरदार टीका केली. काँग्रेसने नेहमीच देशाची सेवा केली, आमच्यासाठी जनता सर्वोपरी आहे. आमचे सरकार, आमचे नेते आणि आमची विचारधारा ओळखा. आपल्या मताचा वापर लोकशाही आणि संविधानासाठी करा असं म्हणत करत त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याचं जनतेला आवाहन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSC Result 2026: मोठी बातमी! दहावीचा निकाल आज जाहीर होणार; 'या' अधिकृत वेबसाईटवर पाहा तुमचे गुण

Medical Store: महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?

मुलासाठी बिबट्याला भिडला बाप, मृत्यूच्या जबड्यातून मुलाची सुटका

Trisha Krishnan : अभिनेत्री त्रिशा कृष्णन उपमुख्यमंत्री होणार? तामिळनाडूत राजकीय वातावरण तापलं

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अटक, आज कोर्टात हजर करणार

SCROLL FOR NEXT