Loksabha Election: सत्तेच्या खुर्चीवर कोण होणार विराजमान? लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात होणार क्लिअर, जाणून घ्या कसं?

Loksabha Election: लोकसभा २०२४ ची निवडणूक २०१९ च्या तुलनेत पूर्णपणे वेगळी ठरलीय. प्रचारातील मुद्दे आणि इंडिया आघाडीची वाढलेली क्रेझ पाहता यंदाच्या निवडणुकीचा कौल कोणाकडे हे अजून स्पष्ट होत नाही. परंतु जाणकारांच्या मते, अखेरच्याच टप्प्यात सत्तेत कोण येणारे हे निश्चित होणार आहे.
Loksabha Election: सत्तेच्या खुर्चीवर कोण होणार विराजमान? लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात होणार क्लिअर, जाणून घ्या कसं?
Loksabha Election

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात १ जून रोजी आठ राज्यांतील ५७ जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात ९०४ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे राजकीय वारसदार मानले जाणारे अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर जागेवर आणि लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मिसा भारती यांच्या पाटलीपुत्र जागेवर परीक्षा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात ५७ मतदारसंघात मतदान होणार आहे. यात बिहार, चंडीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिसा, उत्तर प्रदेश, आणि पश्चिम बंगालमधील मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात उत्तर प्रदेशच्या १३ जागांमधील १४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. बिहारमधील ८ जागांवर १३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर ओडिसाच्या ६ जागांवर ६६ उमेदवार, झारखंडमधील ३ जागांवर ५२ उमेदवार, हिमचाल प्रदेशातील ४ जागांमधील ३७ उमेदवार, पश्चिम बंगालमधील ९ जागांवर १२४ उमेदवार आणि चंदीगडमधील १ एका जागेवर १९ उमेदवार खासदारकी निवडणूक लढवत आहेत.

सातव्या टप्प्यातील राजकीय समीकरण

दरम्यान सातव्या टप्प्यात ज्या ठिकाणी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याठिकाणी २०१९ मध्ये भाजपने जबरदस्त क कामगिरी केली होती. सातव्या टप्प्यात ५७ जागांवर १ जून रोजी निवडणुका होणार आहेत. गेल्या निवडणुकीत या ५७ जागांपैकी भाजपला २५ जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर जेडीयूला ३ जागा मिळाल्या होत्या. अपना दल (एस) दोन जागा मिळाल्या होत्या.

शिरोमणी अकाली दलला २ जागा मिळाल्या होत्या. आम आदमी पार्टीला एक जागा, बीजेडीला २ , जेएमएम एक जागा आणि टीएमसी ९ जागा जिंकण्यात यशस्वी ठरली होती. भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला ३२ जागा जिंकण्यात यश आले होते. तर युपीएला फक्त ९ जागा जिंकण्यात यश आले होते. तर इतर पक्षांना १४ जिंकता आल्या होत्या.

पण यंदाची निवडणूक ही २०१९ च्या तुलनेत खूप वेगळी आहे.पंजाबमध्ये २७ वर्षांपासून अकाली दल आणि भाजप यांची युती होती. आता दोन्ही पक्षांनी वेगवेगळी वाट पकडलीय. तर दुसरीकडे आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष सुद्धा स्वतंत्र निवडणूक लढत आहे. पंजाबमध्ये आपची सरकार आहे, त्याामुळे त्यांना तेथे मोठा विजय मिळणार असल्याचं विश्वास त्यांना आहे. तर हिमाचल प्रदेशात काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळे भाजपला या दोन्ही ठिकाणी विजय मिळवणं सोपं नाही. बिहारपासून यूपीपर्यंत सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत, तर बंगालमध्ये ममता बॅनर्जींसमोर आपल्या जागा राखण्याचे आव्हान आहे.

लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा १ जूनला पार पडणार आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेशातही मतदान होणार आहे. येथील १३ जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. येथे महाराजगज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया, वाराणसी, मिर्झापूर, आणि रॉबर्टसगंज लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे. हे १३ मतदारसंघ पूर्वांचलमध्ये येतात. तर २०१९च्या निवडणुकीत भाजपला १३ पैकी ९ जागा जिंकता आल्या होत्या. तर दोन जागांवर अपना दल (एस) ने विजय मिळवला होता. बसपाने गाझीपूर आणि घोसी जागांवर विजय मिळवला होता. आणि अपना दल एसने मिर्झापूर आणि रॉबर्टसगंजमध्ये विजय मिळवला होता.

Loksabha Election: सत्तेच्या खुर्चीवर कोण होणार विराजमान? लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात होणार क्लिअर, जाणून घ्या कसं?
Loksabha Election: अजित पवारांच्या पराभवासाठी शिंदेंचं बजेट'; शिंदेंच्या रडारवर अजितदादांचेच उमेदवार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com