PM Modi Interview: इंडिया आघाडीचा पराभव झाला आहे, यंदा 2019 चा रेकॉर्ड मोडणार: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024: भाजप यंदा २०१९ चा रेकॉर्ड मोडणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तेलुगू वृत्तवाहिनी NTV ला दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले आहेत.
PM Narendra Modi:
PM Narendra Modi:Yandex

PM Modi Interview:

लोकसभा निवसणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीचा पराभव झाला आहे. भाजप यंदा २०१९ चा रेकॉर्ड मोडणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तेलुगू वृत्तवाहिनी NTV ला दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले आहेत.

NTV ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका केली आहे. ते म्हणाले आहे की, ''तीन टप्प्यात निवडणुका पूर्ण झाल्या असल्या तरी काही लोक मतदानाच्या गणितातच अडकून पडले आहेत. मी या निवडणुकीकडे अंकगणित न पाहता रसायनशास्त्र म्हणून पाहतो. रसायनशास्त्र खूप शक्तिशाली मानले जाते आणि परिणाम दर्शवितात.''

PM Narendra Modi:
Mumbai North West: कोण होणार उत्तर-पश्चिम मुंबईचा खासदार? दोन शिवसैनिकांमध्ये थेट लढत

पंतप्रधान मोदी म्हणाले की, या तीन टप्प्यांमध्ये त्यांनी रॅली, रोड शो केले. माध्यमांशी संवादही साधला. 2014 आणि 2019 च्या निवडणुका पाहिल्या आणि अनेक लोक, जे राजकीय कार्यांपासून दूर राहिले, ते आता उत्साहाने यात सहभागी होताना दिसत आहेत.

ते म्हणाले की, निवडणुकीत लोकांमध्ये भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे. देशभक्ती, समाजभक्ती तळागाळापर्यंत दिसत आहे. पंतप्रधान म्हणाले की, आम्हाला आशा आहे की, ही निवडणूक 2019 चा रेकॉर्ड मोडून टाकेल आणि आमच्या विजयाचे अंतर आणखी वाढेल.

PM Narendra Modi:
Raj Thackeray: अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही, राज ठाकरे यांनी भरसभेत केलं कौतुक

ते म्हणाले की, केरळमध्ये इंडिया आघाडीची परिस्थिती वाईट आहे, जिथे काँग्रेस आणि डावे पक्ष इंडिया आघाडीत प्रतिस्पर्धी आहेत. शेवटपर्यंत जागा ठरवल्या नव्हत्या. प्रचाराचा विषयच नव्हता, मोदींना शिव्या देणे ही रोजची गोष्ट आहे आणि यावेळी काँग्रेसची अवस्था आणखी बिकट असल्याचे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com