Mumbai North West: कोण होणार उत्तर-पश्चिम मुंबईचा खासदार? दोन शिवसैनिकांमध्ये थेट लढत

Ravindra Waikar Vs Amol Kirtikar: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा ठाकरे-शिंदेंचा सामना रंगणार आहे.. ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर तर शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलंय.
कोण होणार उत्तर-पश्चिम मुंबईचा खासदार? दोन शिवसैनिकांमध्ये थेट लढत
Ravindra Waikar Vs Amol KirtikarSaam Tv
Published On

Mumbai North West Lok Sabha Constituency:

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने सामने आलेत. ठाकरे गटाने अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिलीय. तर शिंदे गटाने नुकतेच पक्षात आलेल्या आमदार रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय. त्यामुळे या मतदारसंघातही शिंदे आणि ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

केलेली कामं लोकांना सांगणार: रवींद्र वायकर

आपल्या कामाबद्दल बोलताना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर म्हणाले आहेत की, 'मी किती चांगला आहे, मी किती काम केलं आहे, मी कायद्याचा अभ्यास केला आहे. बीएमसीमध्ये मी कशी कामे केली आहेत. आमदार असताना मी काय काम केली आहे, हे मी लोकांना सांगणार आहे.''

कोण होणार उत्तर-पश्चिम मुंबईचा खासदार? दोन शिवसैनिकांमध्ये थेट लढत
Raj Thackeray: अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही, राज ठाकरे यांनी भरसभेत केलं कौतुक

मला विजयाचा विश्वास: अमोल किर्तीकर

याचबद्दल बोलताना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर म्हणाले की, आमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला खात्री आहे, यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे.''

दरम्यान, विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर शिंदे गटात आहे. गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर ठाकरे गटात आहे. त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली. खासदार कीर्तीकर हे मुलाच्या विरोधात वायकर यांचा प्रचार करतायत. अमोल कीर्तीकर यांची खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशी सुरु आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या रवींद्र वायकरांना शिंदे गटाने उमेदवारी दिलीय. वायकर हे जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या रडारवर होते. भाजपच्या नेत्यांनीच रवींद्र वायकरांवर घोटाळ्याचे आरोप केले होते. तेच वायकर आता उत्तर-पश्चिम मुंबईचे महायुतीचे उमेदवार आहेत. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातीत कोणत्या पक्षाची किती ताकद आहे, हे जाणून घेऊ...

कोण होणार उत्तर-पश्चिम मुंबईचा खासदार? दोन शिवसैनिकांमध्ये थेट लढत
Maharashtra Politics: पक्ष विलीन, शरद पवार आणि बारामतीची जागा; देवेंद्र फडणवीस यांनी बरंच काही सांगितलं!

विधानसभांमध्ये कोणाची ताकद?

  • जोगेश्वरी पूर्व - रवींद्र वायकर - शिंदे गट

  • दिंडोशी - सुनील प्रभू - ठाकरे गट

  • गोरेगाव - विद्या ठाकूर - भाजप

  • वर्सोवा - भारती लवेकर - भाजप

  • अंधेरी पश्चिम - अमित साटम - भाजप

  • अंधेरी पूर्व - ऋतुजा लटके - ठाकरे गट

ठाकरे गट - 2 आमदार

भाजप - 3 आमदार

शिंदे गट - 1 आमदार

एकंदरीत भाजप आणि ठाकरे गटाची ताकद या मतदारसंघात अधिक आहे. रवींद्र वायकर शिंदे गटात गेले असले तरी उद्धव ठाकरेंना मानणारे शिवसैनिक वायकरांसोबत गेलेत का? यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून असणार आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे सामन्यात कुणाचा वरचष्मा होतो हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com