Maharashtra Politics: पक्ष विलीन, शरद पवार आणि बारामतीची जागा; देवेंद्र फडणवीस यांनी बरंच काही सांगितलं!

Devendra Fadnavis: शरद पवार यांना आपण बारामतीची जागा गमावत आहोत, याची जाणीव झाली आहे म्हणूनच त्यांनी हे वक्तव्य केलं आहे की, 4 जूननंतर सर्व प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे: देवेंद्र फडणवीस
पक्ष विलीन, शरद पवार आणि बारामतीची जागा; देवेंद्र फडणवीस यांनी बरंच काही सांगितलं!
Devendra Fadnavis On Sharad PawarSaam TV

Devendra Fadnavis On Sharad Pawar:

पंतप्रधान मोदींनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की, शरद पवार यांना आपण बारामतीची जागा गमावत आहोत, याची जाणीव झाली आहे म्हणूनच त्यांनी हे वक्तव्य केलं आहे की, 4 जूननंतर सर्व प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, लागेल कारण या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणार आहे, असं शरद पवार यांच्या वक्तव्यावर आपापली प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

फडणवीस म्हणाले की, ''पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, शरद पवार यांचा पक्ष असो की शिवसेना, त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जावे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जावं. कारण काँग्रेसचे काहीही भविष्य नाही आहे.''

पक्ष विलीन, शरद पवार आणि बारामतीची जागा; देवेंद्र फडणवीस यांनी बरंच काही सांगितलं!
Arvind Kejriwal Released : मद्यधोरण घोटाळ्यात अटक, ५१ दिवस तुरुंगात; अरविंद केजरीवालांची तिहारमधून सुटका

'काँग्रेसने कोर्टात याचिका दाखल करत श्रीरामाच्या अस्तित्वाला चॅलेंज केलं होतं'

राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, ''काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत श्रीरामाच्या अस्तित्वाला चॅलेंज केलं होतं. त्यांनी याचिका दाखल करत रामसेतूलाही चॅलेंज केलं होतं.''

पक्ष विलीन, शरद पवार आणि बारामतीची जागा; देवेंद्र फडणवीस यांनी बरंच काही सांगितलं!
Arvind Kejriwal bail: अरविंद केजरीवालांना जामीन मिळाला, पण सुप्रीम कोर्टानं घातल्या ५ महत्वाच्या अटी

ते म्हणाले, ''हे लोक प्रश्न विचारायचे की, राम काल्पनिक आहेत की, ते खरोखर होते? यांनी जाणीवपूर्वक राम मंदिराचा मुद्दा अडकवून ठेवला. मात्र पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिराचा निर्णय कोर्टाकडून यावा, यासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर राम मंदिराचे निर्माणही केले. आज राम मंदिरात प्राणप्रतिष्ठाही झाली आहे. यांचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. ''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com