Arvind Kejriwal Released : मद्यधोरण घोटाळ्यात अटक, ५१ दिवस तुरुंगात; अरविंद केजरीवालांची तिहारमधून सुटका

Arvind Kejriwal bail: दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ५१ दिवस तिहार तुरुंगात राहिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी संध्याकाळी अंतरिम जामिनावर बाहेर आले आहेत.
Arvind Kejriwal Released
Arvind Kejriwal ReleasedSaam Tv

Arvind Kejriwal Released News:

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ५१ दिवस तिहार तुरुंगात राहिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी संध्याकाळी अंतरिम जामिनावर बाहेर आले आहेत. यावेळी तुरुंगाबाहेर केजरीवाल यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. केजरीवाल तुरुंगाबाहेर येताच ते गाडीत बसले आणि तिथे उपस्थित लोकांना अभिवादन करून ते थेट घराकडे रवाना झाले आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या स्वागतासाठी तिहार तुरुंगाबाहेर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर केजरीवाल पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काही मेसेज देतील, असं बोललं जात होतं. मात्र ते काहीही न बोलता थेट घराच्या दिशेने रवाना झाले.

Arvind Kejriwal Released
Arvind Kejriwal bail: अरविंद केजरीवालांना जामीन मिळाला, पण सुप्रीम कोर्टानं घातल्या ५ महत्वाच्या अटी

मात्र तुरुंगापासून काही अंतरावर गेल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अरविंद केजरीवाल यांनी तेथे उपस्थित लोकांना आवाहन केलं की, सर्वांनी हुकूमशाहीविरुद्ध एकत्र लढले पाहिजे. देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तन, मन, धनाने लढत असल्याचे ते म्हणाले. पण हा लढा माझा एकट्याचा नाही. या लढ्यात देशातील 140 कोटी जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे.

Arvind Kejriwal Released
Navneet Rana: राहुल गांधी यांच्याबद्दल केलं वादग्रस्त वक्तव्य, नवनीत राणा यांच्याविरोधात FIR दाखल

त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, सर्वांनी उद्या सकाळी 11 वाजता कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात पोहोचावे. तिथे आपण हनुमानजींचा आशीर्वाद घेऊन लढा चालू ठेवू. त्यानंतर उद्या दुपारी एक वाजता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com