6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

Massive Corruption Alleged in CM Gram Sadak Yojana Road Project: राज्य सरकारच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल करणारी बातमी समोर आलीये. सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामीण भागात रस्त्यांचं जाळं विकसित करतंय. मात्र, ग्राऊंडवर रियालिटी काही वेगळीच आहे. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
₹6 CRORE ROAD DAMAGED IN JUST ONE MONTH | CM GRAM SADAK YOJANA EXPOSED
₹6 CRORE ROAD DAMAGED IN JUST ONE MONTH | CM GRAM SADAK YOJANA EXPOSEDsaam tv
Published On

राज्यात मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्ते महामार्गांची दुरावस्था झालेली असताना जालन्यात धक्कादायक प्रकार समोर आलाय. महिनाभरापूर्वीच तब्बल 6 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता हातानेच उखडत असल्याचा पर्दाफाश झालाय. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत परतूर तालुक्यातील सोयंजना-हातडी ते येणोरा असा 13 किलोमीटरचा तयार करण्यात आला होता. मात्र, महिन्याभरातच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बनवलेल्या रस्त्याच्या कामाची पोलखोल झालीये. निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीये.

महत्त्वाचं म्हणजे, राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीये. त्यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागतोय. अशातच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही राज्यातील ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठीची महत्त्वाची योजना आहे. या योजनेसाठी राज्य सरकारनं हजारो कोटींचं कर्जदेखील काढलंय. मात्र, जालन्यातील रस्ते बांधकामानं शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची लक्तरं वेशीला टांगलीयेत. त्यामुळे सरकारच्या निधीत झोल करणाऱ्या अधिकाऱी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com