Priyanka Gandhi: राहुल गांधी पुन्हा 2 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात, प्रियंका गांधींसाठी काँग्रेसचा प्लॅन काय? बड्या नेत्याने दिली माहिती

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा 2019 प्रमाणे दोन जागांवरून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते वायनाड आणि रायबरेलीमधून निवडणूक लढवणार आहेत.
Rahul Gandhi and Priyanka Gandhi
Rahul Gandhi and Priyanka GandhiSaam Tv

Lok Sabha Election 2024:

काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा 2019 प्रमाणे दोन जागांवरून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते वायनाड आणि रायबरेलीमधून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी प्रियांका गांधीही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र कोणत्याही जागेवरून त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

प्रियंका गांधींनी निवडणूक न लढवल्याने भाजपने काँग्रेसवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की, राहुल गांधींच्या कॅम्पला प्रियंका गांधींनी राजकारणात पुढे जावं, असं वाटत नाही. यातच राहुल गांधी एकीकडे दोन जागांवर निवडणूक लढवत असताना प्रियांका गांधी यांच्यासाठी काँग्रेसचा प्लॅन काय आहे? असा अनेकांना पडला आहे. याचेच उत्तर काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिलं आहे.

Rahul Gandhi and Priyanka Gandhi
Amit Shah: उद्धव ठाकरे नकली सेनेचे अध्यक्ष, बाळासाहेबांचे नाव घेऊ नये; अमित शहांची टीका

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रियांका गांधी निवडणूक न लढविण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सोशल मीडिया हँडलवर लिहिले आहे की, ''रायबरेली ही फक्त सोनिया यांचीच नाही, तर खुद्द इंदिरा गांधी यांचीही सीट आहे आहे. हा वारसा नाही, जबाबदारी आहे, कर्तव्य आहे.''

ते म्हणाले, ''गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्याचा विचार केला तर, फक्त अमेठी-रायबरेलीच नाही तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत संपूर्ण देश गांधी घराण्याचा गड आहे. राहुल गांधी उत्तर प्रदेशातून तीनदा आणि केरळमधून एकदा खासदार झाले, पण विंध्याचलमधून निवडणूक लढवण्याची हिंमत मोदीजी का दाखवू शकले नाहीत?''

Rahul Gandhi and Priyanka Gandhi
Narayan Rane : सत्ता गेल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

प्रियांका गांधी निवडणूक लढवणार का?

प्रियंका गांधी यांच्या निवडणूक लढविल्याबद्दल जयराम रमेश म्हणाले, "प्रियांका गांधी या जोरदार प्रचार करत आहेत आणि नरेंद्र मोदींच्या प्रत्येक खोट्या वक्तव्याला सत्याने उत्तर देऊन त्या एकट्याच मोदींना गप्प करत आहेत. म्हणूनच हे महत्त्वाचं आहे की, त्यांना फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित ठेवले जाऊ नये. प्रियांका गांधी या कोणतीही पोटनिवडणूक लढवून सभागृहात पोहोचतील.''

जयराम रमेश पुढे म्हणाले, राहुल गांधी हे राजकारण आणि बुद्धिबळाचे अनुभवी खेळाडू आहेत. ते विचारपूर्वक निर्णय घेतात. मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून पक्ष नेतृत्वाने बऱ्याच चर्चेनंतर, असा निर्णय घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com