Amit Shah: उद्धव ठाकरे नकली सेनेचे अध्यक्ष, बाळासाहेबांचे नाव घेऊ नये; अमित शहांची टीका

Amit Shah Rally In Ratnagiri: रत्नागिरीत नारायण राणे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
 Amit Shah Rally In Ratnagiri
Amit Shah Rally In Ratnagiri

(सुरज मसूरकर)

रत्नागिरी: महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीत घेण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलतांना अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आपल्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घेऊ शकतील का? आहे का त्यांच्यात हिम्मत? नाही तर तुम्ही शिवसेनेचे नाही तर नकली सेनेचे अध्यक्ष आहात, असा टोला अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

इंचलकरजीतील सभेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी पक्ष फुटीवर भाजपवर हल्लाबोल केला होता. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंच्या गटाला नकली शिवसेना म्हटलं होतं. यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकेची तोफ डागली होती. ठाकरेंच्या त्या हल्लाबोलावर आज अमित शहा यांनी रत्नागिरीत उत्तर दिलंय.

शिवाजी महाराजांनी येथूनच दिल्ली आणि समुद्रावर हिंदुत्त्वाचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. येथे टिळकांचाही जन्म झाला, टिळक म्हणाले होते स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, त्यांनी इंग्रजांना ललकारले होते. सावरकरांनी येथेच क्रांतिकारी गोष्टी केल्या. मी आज प्रचारासाठी आलोय, यामुळे नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारतोय. उद्धव ठाकरे काय आपल्या भाषणात सावरकरांचे नाव घेण्याची हिम्मत करू शकतात का? हिम्मत नसेल तर ते नकली शिवसेना चालवत आहेत. खरी शिवसेना शिंदेंकडेच असल्याचं प्रतिपादन केलंय.

मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसच्या पाया पडलेत. उद्धव ठाकरेंनी काश्मीरमधील ३७० बद्दल वेगळी भूमिका घेणाऱ्यांच्या पाया पडलेत. पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी राम मंदिर बांधून दाखवलं. तर काय उद्धव ठाकरे राममंदिर झालं ते चांगलं झालं असं म्हणू शकतात का? उद्धव ठाकरे राममंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत गेलेत. माझं ठाकरेंना आव्हान आहे, तिहेरी तलाक हटविला ते योग्य आहे हे म्हणू शकता का? पीएफआयवर बंदी घातली ते योग्य आहे का हे सांगू शकता का?

यंदाची निवडणूक ही पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पीएम बनण्यासाठी आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी नारायण राणें प्रचंड मतांनी निवडणू द्या. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवल्याने देश तिसरी आर्थिक महासत्ता होईल. मोदींनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्यास्थानी आणल्याचा दावा अमित शहा यांनी केलाय. यामुळे मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करणं म्हणजे देशाला सशक्त करणं, असं शहा म्हणाले.

 Amit Shah Rally In Ratnagiri
Narayan Rane : सत्ता गेल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com