Narayan Rane : सत्ता गेल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपसोबत युती केली आणि पण स्वार्थासाठी हिंदुत्व सोडलं. त्यांनी आमच्यावर बोलू नये. त्यांची सत्ता गेली त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं चाललंय अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
Narayan Rane
Narayan RaneSaam Digital
Published On

त्याकाळात शिवसेनेसाठी जीवाची परवा न करता काम केलं. तेव्हा हे कुठे होते. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी आयुष्य वेचलं. उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपसोबत युती केली आणि पण स्वार्थासाठी हिंदुत्व सोडलं. त्यांनी आमच्यावर बोलू नये. त्यांची सत्ता गेली, आता या निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं चाललंय अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. आज रत्नागिरीत नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला अमित शहा आणि राज्यातील भाजप आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

मोदी सरकारने गरीब जनतेला घरं दिली. तिसऱ्यांदा पंतप्रधान जेव्हा होतील तेव्हा देशाला महासत्ता बनवायचं काम करू. महिला, युवक आणि गरिबांसाठी काम करू. आमचे विरोधक काय बोलतात? विकासावर बोलत नाही? लोकांच्या प्रश्नावर बोलत नाहीत. १० वर्ष उद्धव ठाकरेंचा खासदार होते. त्यांनी टीकेशिवाय काय केलं नाही. तीन दिवस आहेत यांचा असा पराभव करा की त्यांच डिपाॅजिट जप्त झालं पाहिजे. कॅलिफोर्नियाच्या लोकांनी म्हणावं असा विकास आम्हाला करायचा आहे असं कोकण बनवायचं असल्याचं ते म्हणाले.

उद्धव ठाकरे नकली शिवसेनेचे अध्यक्ष-अमित शहा

यावेळी प्रचारसभेत बोलतांना अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आपल्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घेऊ शकतील का? आहे का त्यांच्यात हिम्मत? नाही तर तुम्ही शिवसेनेचे नाही तर नकली सेनेचे अध्यक्ष आहात, असा टोला अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Narayan Rane
Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

शिवाजी महाराजांनी कोकणातूनच दिल्ली आणि समुद्रावर हिंदुत्त्वाचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. याच भूमिवर टिळकांचाही जन्म झाला, टिळक म्हणाले होते स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, त्यांनी इंग्रजांना ललकारलं होतं. सावरकरांनी येथेच क्रांतिकारी गोष्टी केल्या. मी आज प्रचारासाठी आलोय, यामुळे नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारतोय. उद्धव ठाकरे काय आपल्या भाषणात सावरकरांचे नाव घेण्याची हिम्मत करू शकतात का? हिम्मत नसेल तर ते नकली शिवसेना चालवत आहेत. खरी शिवसेना शिंदेंकडेच असल्याचं प्रतिपादन केलंय.

Narayan Rane
Maharashtra Election: १३ जागांवर ठाकरे गट विरुद्ध शिवसेना; १५ ठिकाणी काँग्रेस -भाजप 'सामना', कुठे-कोण आमनेसामने?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com