Maharashtra Election: १३ जागांवर ठाकरे गट विरुद्ध शिवसेना; १५ ठिकाणी काँग्रेस -भाजप 'सामना', कुठे-कोण आमनेसामने?

Maharashtra Election: ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. राज्यातील ९० टक्के जागांवर शिंदे गटाचा सामना थेट ठाकरे गटाशी होणार आहे.
Maharashtra Election: राज्यातील १३ जागांवर ठाकरे गटविरुद्ध शिवसेना,तर १५ जागेवर काँग्रेसची भाजपशी लढत
Maharashtra ElectionSaam Tv

मुंबई : यंदाची लोकसभा निवडणूक सर्व राजकीय पक्षांसाठी चुरशीची ठरणार आहे. लोकसभेच्या एकूण जागांपैकी ४८ जागा एकट्या महाराष्ट्रात आहेत. सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्यातील दोन्ही प्रादेशिक पक्षात फूट पडलीय. दोन्ही पक्षांचे दोन शकलं झाली असून दोन्ही शकलं लोकसभेच्या रिंगणात उतरलीत.

शिवसेनेत फूट पाडून भाजपशी गट्टी जमवणाऱ्या शिंदे गटाचा सामना थेट ठाकरे गटाशी होणार आहे. राज्यातील १३ जागांवर शिवसेनाविरुद्ध ठाकरे गट असा सामना होणार आहे. तर १५ जागांवर भाजपविरुद्ध काँग्रेसची अशी थेट लढत असणार आहे.

ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. राज्यातील ९० टक्के जागांवर शिंदे गटाचा सामना थेट ठाकरे गटाशी होणार आहे. तर राज्यातील लोकसभेच्या १५ जागांवर भाजप आणि काँग्रेसची लढत होणार आहे. तर बारामती आणि शिरुरमध्ये राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे.

मुंबईत, उत्तर मध्य आणि उत्तरच्या मतदारसंघात भाजपने उमेदवार बदलली आहेत. मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पालघरसह २८ जागांपैकी २३ जागा जिंकल्या होत्या. भाजपने अखेरच्या क्षणी पालघरमधील उमेदवारी जाहीर केली.

उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलीय. निकम यांचा सामना वर्षा गायकवाड यांच्याशी होणार आहे. तर शिवसेनेने उत्तर पश्चिम मुंबईत रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिलीय.

याचा परिणाम राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर होणार आहे. ईशान्य मुंबईत ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिलीय. संजय पाटील यांनी २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

Maharashtra Election: राज्यातील १३ जागांवर ठाकरे गटविरुद्ध शिवसेना,तर १५ जागेवर काँग्रेसची भाजपशी लढत
Maharashatra Election: ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा किल्ला राखणं शिंदेंना जड?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com