Pm Modi Interview: राहुल गांधी, अरविंद केजरीवालांना पाकिस्तानचं समर्थन; चौकशी झाली पाहिजे PM मोदी

Pm Modi Interview: राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना पाकिस्तानमधून मिळणाऱ्या पाठिंब्याची चौकशी केली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत दिलीय.
Pm Modi Interview: राहुल गांधी, अरविंद केजरीवालांना पाकिस्तानचं समर्थन; चौकशी झाली पाहिजे PM मोदी
Pm Modi Interviewsunday guardian

नवी दिल्ली: मागील आठवड्यात दिल्लीत १७ लोकसभेसाठी मतदान झालं. त्यावेळी पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचा मतदान करताना व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळी फवाद यांनी राहुल गांधी आणि केजरीवाल यांचं कौतुक केलं होतं. तेव्हा अरिंवद केजरीवाल यांनी फवाद यांना खडेबोल सुनावले होते. मात्र यावरून हल्लाबोल करत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटची चौकशी केली पाहिजे असं म्हटलंय.

ही चौकशी आणि तपासाची गंभीर बाब असल्याचं पीएम मोदींनी म्हटलंय. उल्लेखनीय आहे की, भारतात लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्याबाबत पाकिस्तानातून पाठिंबा मिळत आहे. त्यावरून मोदींना तीव्र प्रतिक्रिया दिलीय. राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्याबाबत पाकिस्तानने केलेल्या टिप्पण्यांबाबत 'आयएएनएस' या वृत्तसंस्थेने पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले

"निवडणूक भारताची आहे आणि भारताची लोकशाही अतिशय परिपक्व आहे आणि त्याला निरोगी परंपरा आहे." भारतातील मतदार देखील हुशार आहेत. ते बाहेरील व्यक्तींच्या कृतीने प्रभावित होणारे मतदार नाहीत. पण काही मोजकेच लोक आहेत, ज्यांना आमच्याशी वैर असणाऱ्या लोकांना आवडतात. तेथून यांच्या समर्थनार्थ नारे का दिले जातात? त्यामुळे ही गंभीर असून त्याचा तपास झाला पाहिजे. मला वाटत नाही की माझ्या पदावर असताना अशा विषयांवर कोणतीही टिप्पणी केली जावी, परंतु मी चिंता समजू शकतो, असं मोदी म्हणालेत.

दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला. त्यावर त्यांनी लिहिले की, मी आज माझे वडील, पत्नी आणि मुलांसह मतदान केले. माझ्या आईची तब्येत खूप खराब आहे. म्हणून ती येऊ शकली नाही. मी हुकूमशाही, बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात मतदान केले. तुम्हीही मतदानासाठी जावे, असं म्हटलं होतं. त्यानंतर पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी केजरीवाल यांचा फोटो पोस्ट केला होता. फोटो पोस्ट करताना फवाद म्हणाले की, ''शांतता आणि सद्भावनेने द्वेष आणि अतिरेकी शक्तींचा पराभव करावा.''असं म्हटलं होतं.

Pm Modi Interview: राहुल गांधी, अरविंद केजरीवालांना पाकिस्तानचं समर्थन; चौकशी झाली पाहिजे PM मोदी
Loksabha Election: सत्तेच्या खुर्चीवर कोण होणार विराजमान? लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात होणार क्लिअर, जाणून घ्या कसं?

यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पाकिस्तानी नेते फवाद चौधरी यांना चोख प्रत्युत्तर दिले. चौधरी साहेब, मी आणि माझ्या देशातील जनता त्यांचे प्रश्न हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, तुमच्या ट्विटची गरज नाही. सध्या पाकिस्तानची स्थिती अत्यंत वाईट आहे. तुम्ही तुमच्या देशाची काळजी घ्या, असे म्हणत केजरीवाल यांनी फवाद यांना सुनावले होते. दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला चौधरी फवाद हुसैन यांनीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक केले होते. त्यांनी X वर लिहिले होते की, त्यांचे आजोबा जवाहरलाल (नेहरू) यांच्याप्रमाणे राहुल गांधी यांच्याही समाजवादी भावना आहे.

फाळणीच्या ७५ वर्षांनंतरही भारत आणि पाकिस्तानचे प्रश्न जैसे थे आहेत. राहुल गांधी काल रात्री आपल्या भाषणात म्हणाले की, भारताची ७० टक्के संपत्ती ३० किंवा ५० कुटुंबांकडे आहे. हेच पाकिस्तानला लागू होते, जिथे फक्त पाकिस्तान बिझनेस कौन्सिल नावाचा बिझनेस क्लब आणि काही रिअल इस्टेट मॅग्नेट्सकडे पाकिस्तानची ७५ टक्के संपत्ती आहे. संपत्तीचे न्याय्य वितरण हे भांडवलशाहीचे सर्वात मोठे आव्हान असल्याचं फवाद म्हणाले होते.

Pm Modi Interview: राहुल गांधी, अरविंद केजरीवालांना पाकिस्तानचं समर्थन; चौकशी झाली पाहिजे PM मोदी
Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पहिल्या ५ टप्प्यांची आकडेवारी जाहीर, कोणत्या टप्प्यात किती मतदान झालं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com