व्हॉट्सअॅप हे मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. भारतात व्हॉट्सअॅपने 71.1 लाख अकाउंटवर बंदी घातली आहे. आयटी कायद्यानुसार व्हॉट्सअॅपच्या या सर्व अकाउंटवर (Account) बंदी घालण्यात आली आहे. दर महिन्याला व्हॉट्सअॅप तक्रारींच्या आधारे कारवाई करते आणि महिन्याच्या शेवटी युजर्ससाठी सुरक्षा अहवाल जारी करते.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यंदा ही कारवाई 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान करण्यात आली होती. या कालावधीत, +91 देश कोड असलेल्या 71,11,000 या व्हॉट्सअॅप (WhatsApp) अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. यापैकी 25,71,000 अकाउंटवर कंपनीनेच बंदी घातली आहे, म्हणजेच लोकांनी या अकाउंटबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही.
सप्टेंबर महिन्यात व्हॉट्सअॅपला तक्रार अपील समितीकडून सहा आदेश मिळाले आहेत. ते सर्व स्वीकारण्यात आले होते. याआधी ऑगस्टमध्ये व्हॉट्सअॅपने भारतात 74 लाख अकाउंट बंद केली.
सप्टेंबर महिन्यात 10,442 युजर्सनी व्हॉट्सअॅपवर स्पॅमची तक्रार केली होती. अकाउंटच्या सपोर्टबाबत 1,031 तक्रारी, बंदी घालण्याबाबत 7,396, सुरक्षिततेबाबत 127 आणि इतर सपोर्टबाबत 1,518 तक्रारी होत्या.
तुमचे खाते देखील बॅन केले जाऊ शकते.
2021 मध्ये नवीन IT नियम लागू केल्यानंतर, WhatsApp दर महिन्याला तक्रार अपील अहवाल जारी करते. यामध्ये स्पॅम, न्यूडिटी इत्यादी तक्रारींचा समावेश आहे. तुम्हीही तुमच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटवरून अशी कोणतीही अॅक्टिव्हिटी करत असल्यास, तुमचे अकाउंटही बॅन केले जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.