Whatsapp Secret Code Feature : व्हॉट्स्अॅपचा सीक्रेट कोड ; तुमचं चॅटिंग राहणार गुपित; कसं ते जाणून घ्या

Whatsapp Feature: व्हॉट्सअॅप नवीन फिचर लाँच करु शकते.
Whatsapp Secret Code Feature
Whatsapp Secret Code FeatureSaam Tv
Published On

Whatsapp Upcoming Secret Code Feature :

जगात लाखो लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्स्ॅपचा वापर करुन कोणत्याही देशातील व्यक्तीशी संपर्क करु शकतो. व्हॉट्सअॅप नेहमीच युजर्सच्या वापरासाठी नवीन फिचर लाँच करत असते. तर आता व्हॉट्सअॅपच्या चॅट्सच्या सुरक्षेसाठी नवीन सीक्रेट कोड फिचर लाँच करण्याच्या तयारीत आहे.

युजर्सचे चॅट आणि गोपनियता वाढवण्यासाठी हे फिचर लाँच करण्यात येणार आहे. याआधी व्हॉट्सअॅपने चॅट लॉक हे फिचर उपलब्ध केले होते. मात्र, या नवीन फिचरमुळे अधिक सुरक्षा मिळेल. तुम्ही तुमच्या मित्राला फोन दिल्यास त्याच्यापासून चॅट लपवण्यासाठी हे फिचर काम करेल.

Whatsapp Secret Code Feature
Business Idea: कमी गुंतवणूकीत होईल जास्त फायदा! २० हजारात सुरु करा व्यवसाय, या आहेत 5 बेस्ट आयडिया

व्हॉट्सअॅप नवीन सीक्रेट कोड फिचर लाँच करु शकते

व्हॉट्सअॅपचं नवीन फिचर चॅट लॉकसाठी कस्टम पासवर्ड सेट करण्याची परवानगी देईल. लॉक केलेले चॅट्स शोधण्यासाठी या नवीन फिचरचा वापर करता येईल. युजर्संना यासाठी सर्च बारमध्ये तुमचा कोड टाकावा लागेल त्यानंतर लॉक केलेले चॅट तुम्हाला दिसेल. हे चॅट्स तुम्ही इतर डिव्हाइसवरदेखील पाहू शकता.

व्हॉट्सअॅपने याआधी फिंगरप्रिंट, फेस अनलॉक किंवा पिन कोड वापरुन चॅट लॉक करण्याची परवानगी देत आहे. परंतु आता व्हॉट्सअॅप चॅट सुरक्षेसाठी नवीन फिचर लाँच करणार आहे.

एका रिपोर्टनुसार, चॅट लॉक फिचरनंतर आता सिक्रेट कोड हे फिचर लवकरच लाँच केले जाईल. कंपनी सर्व डिव्हाइसवर चॅट लॉकची सुविधा देते. तर आता व्हॉट्सअॅपच्या नवीन सीक्रेट कोड या फिचरवर काम सुरु असल्याचे म्हटले आहे. व्हॉट्सअॅपच्या या नवीन फिचरबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या नवीन फिचरमध्ये तुमचे चॅट अधिक सुरक्षित राहू शकतात.

Whatsapp Secret Code Feature
FD Investment : Fixed Deposit करा अन् मिळवा रेकॉर्ड ब्रेकिंग व्याज, तुमचं या बँकेत खातं आहे का?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com