Fixed Deposit Scheme
Fixed Deposit SchemeSaam Tv

FD Investment : Fixed Deposit करा अन् मिळवा रेकॉर्ड ब्रेकिंग व्याज, तुमचं या बँकेत खातं आहे का?

Which Bank has the Highest Interest Rate for Fixed Deposit : तुम्हालाही एफडीमधून चांगला परतावा हवा असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे.
Published on

Investment FD Interest Rate :

नुकत्याच झालेल्या RBI च्या पतधोरण समितीच्या बैठकीत या वेळीही रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात बदल करण्यात आले होते.

RBI ने रेपो दरात वाढ न केल्यामुळे बँक मुदत ठेवींच्या व्याजदार वाढ न होण्याची शक्यता नाही असे म्हटले आहे. परंतु जर तुम्हालाही एफडीमधून चांगला परतावा हवा असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे.

स्मॉल सेक्टरमधील फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ही एफडीवर तुम्हाला चांगला परतावा देत आहे. यामध्ये तुम्हाला वर्षभरात ९.१५ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेद्वारे एफडीवर दिलं जाणारं व्याज हे SBI आणि HDFC सारख्या मोठ्या बँकेपेक्षा अधिक पटीने जास्त देत आहे.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या (Bank) वेबसाइटनुसार, बँक सामान्य ग्राहकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळे व्याजदर देत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांना ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर २ ते ८.५१ टक्के व्याज (Interest) देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ३.६० टक्के ते ९.१५ टक्के व्याजदर देत आहे.

Fixed Deposit Scheme
Home Loan : वेळेपूर्वीच गृहकर्जाचे हफ्ते फेडताय? या ५ गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

1. बँक व्याजदर कसे देते?

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ७ ते १४ दिवसांच्या कालावधीत मॅच्युअर एफडीवर २ टक्के तर १५ ते ३० दिवसांच्या कालावधीसाठी मॅच्युअर एफडीवर (Fixed Deposit) ४.५० टक्के देते तर ३१ ते ४५ दिवसांच्या एफडीवर ४.७५ टक्के वार्षिक दराने व्याज देत आहे. तसेच यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कालावधीसाठी मॅच्युअर एफडीवर व्याज मिळत आहे. अशातच इतर ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ५० बेसिस पॉइंट अधिक व्याज मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com