Home Loan : वेळेपूर्वीच गृहकर्जाचे हफ्ते फेडताय? या ५ गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

How To Foreclose Home Loan : बरेचदा पैसे असूनही आपल्याला लोनचे हफ्ते वेळेआधीच भरता येत नाही कारण आपल्याकडे याबाबतची अधिक माहिती नसते.
Home Loan
Home Loan Saam TV
Published On

Check 5 Things Before Foreclosing Loan :

मुंबईसारख्या शहरात स्वत:चे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाला वाटते परंतु, वाढती महागाई पाहून घर खरेदी करताना नाकी नऊ येतात. महागाईमुळे घराच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत. ज्यामुळे घर खरेदी करताना आपल्याला अधिक मेहनत घ्यावी लागते.

घर खरेदी करताना आपल्या डोक्यात सगळ्यात आधी लोन घेण्याचा विचार येतो. लोन घेतल्यानंतर आपल्याला त्याचा महिन्याचा EMI हफ्ता देखील भरावा लागतो. बरेचदा पैसे असूनही आपल्याला लोनचे हफ्ते वेळेआधीच भरता येत नाही कारण आपल्याकडे याबाबतची अधिक माहिती नसते.

बरेचदा गृहकर्जाचे हफ्ते वेळेपूर्वीच भरताना आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे आपल्याला मोठं नुकसान सहन करावे लागते. जर तुम्ही देखील वेळेपूर्वीच गृहकर्जाचे हफ्ते भरत असाल तर या ५ चुका करणे टाळा.

गृहकर्ज (Home loan) देणाऱ्या बँका (Bank) आणि एनबीएफसी आपल्याला ग्राहकांना वेळेआधी गृहकर्ज फेडण्याची सुविधा देते. यासाठी वित्तसंस्था देखील वेगवेगळ्या अटी ग्राहकांना देते. यामध्ये कधीकधी ग्राहकांना यामध्ये हिडन चार्जेस देखील भरावे लागते. ज्यामुळे वेळेपूर्वीच गृहकर्ज परतफेडल्यानंतरही कोणताही लाभ मिळत नाही.

Home Loan
Rs 2000 Note Change : दोन हजारांची नोट अजूनही पॉकटेमधेच? या शहरांमध्येच बदलण्याची संधी, पाहा लिस्ट

गृहकर्जाची परतफेड करताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा

1. फोरक्लोजर चार्जेस

जर तुम्ही गृहकर्जाची परतफेड वेळेपूर्वी करत असाल तर त्याला फोरक्लोजर असे म्हटले जाते. RBI चा नियम सांगतो की, व्याजदर फ्लोटिंग रेट असल्यास गृहकर्जावर फोरक्लोजर फी आकारली जात नाही. यामध्ये गृहकर्जाचा व्याजदर बदलत जरी असाला तरी प्री-मॅच्युअर लोन क्लोजिंगवर कोणतेही दंड आकारला जाऊ शकत नाही. तसेच फिक्स्ड होम लोनवर आपल्याला ४ ते ५ टक्के फोरक्लोजर फी भरावी लागते.

2. फोरक्लोजर करण्यापूर्वी बँकेला कळवा

जेव्हा तुम्ही तुमच्या गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड करणार असाल, तेव्हा तुमच्या बँकेला किंवा NBFC ला २ ते ३ आठवडे अगोदर कळवा.

Home Loan
Gold Silver Price Today (10th October): इस्त्राईल-हमास युद्धामुळे सोन्याच्या दरात उसळी, आठवड्याभरात 3000 रुपयांहून अधिक महाग, चेक करा आजचे दर

3. NOC घ्या

गृहकर्जाची परतफेड मुदतीआधी करत असाल तर तुमच्या बँक किंवा NBFC कडून 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) घ्या. अन्यथा तुमचा CIBIL स्कोअर खराब होऊ शकतो.

4.गृहकर्ज घेताना गहाण ठेवलेल्या वस्तू

गृहकर्ज मुदतीआधी भरत असाल तर गहाण ठेवलेले कागदपत्रे आधी घ्या. ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक मालमत्तेवर कोणतीही अडचण येणार नाही.

5. घराची कागदपत्रे घ्या

वेळेपूर्वी गृहकर्ज बंद करताना बँकेकडून घराची मूळ कागदपत्रे घ्या. ज्यामुळे भविष्यात आपल्याला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com