२०१६ मध्ये नोटबंदी झाल्यानंतर पाचशे आणि दोन हजारांच्या नवी नोटा चलनात आली. पण १९ मे २०२३ दोन हजारांच्या नोटा चलानातू बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशातच बँकेत २००० हजारांची नोट जमा करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. ७ ऑक्टोबर ही दोन हजारांची नोट बदलण्याची शेवटची मुदत होती. परंतु, जर तुम्ही देखील अजूनही नोटा चेंज केल्या नसतील तर घाबरु नका.
जर नोटा बदलायचा असतील तर तुम्हाला RBI च्या ऑफिसमध्ये जावे लागेल. तसेच दोन हजारांच्या नोटा भारतातील या ठिकांणी बदलून मिळतील. तसेच या नोटा आपण पोस्टाद्वारे देखील पाठवू शकतो.
1. एका दिवसात किती नोटा बदलता येतील?
RBI च्या गाईडलाइनुसार एका वेळी कोणत्याही व्यक्तीला दोन हजार रुपयांच्या 10 नोटा बदलता येतील. तसेच या बदलताना ओळखपत्र देखील दाखवावे लागेल.
2. या ठिकाणी बदलू शकता दोन हजारांच्या नोटा
अहमदाबाद
बेंगळुरु
बेलापुर
भोपाळ
भुवनेश्वर
चंदीगढ
चेन्नई
गुवाहाटी
हैदराबाद
जयपुर
जम्मू
कानपूर
कोलकाता
लखनऊ
फोर्ट-मुंबई (Mumbai)
नागपुर
नवी दिल्ली
केंद्र सरकारने दोन हजारांच्या नोटा चलनातून बाहेर केल्या असल्या तरीही त्या कायदेशीररित्या चलनात आहे. या नोटा आरबीआयच्या विभागीय कार्यालयात बदलता येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.