Gold Silver Rate In Maharashtra (10th October):
इस्त्राईल हमास युद्धाचा आजचा पाचवा दिवस असून याचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला आहे. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.
इस्त्राईल हमास युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत सोने-चांदीच्या दरात मोठी उसळण पाहायला मिळत आहे. अलीकडेच गुंतवणूकीसाठी सोने अधिक सोयीचे मानले जात आहे. मागील आठवड्याभरात सोन्याच्या किमतीत पडझड पाहायला मिळाली. उच्चांकी दरापेक्षा जवळपास ५००० रुपयांनी स्वस्त झाले होते. काल सुवर्णनगरी जळगावात १००० रुपयांनी वाढ झाली आहे. अशातच सोने ५९ हजारांवर पोहोचले आहे.
1. सोन्याच्या दरात वाढ
सोन्याच्या (Gold) दराने आजही उच्चांकाची पातळी गाठली आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार २२ कॅरेट सोन्यासाठी १ ग्रॅमचा भाव ५,३८० रुपये तर २४ कॅरेटनुसार प्रतितोळ्यासाठी ५८,६८० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या दरात ३३०० रुपयांनी वाढ झाली.
2. चांदीचा आजचा भाव
चांदीच्या दरातही किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी चांदीचे (Silver) प्रति किलो दर ७३ हजारांवर पोहोचले होते. अशातच काल प्रति किलो ६९ हजार ५०० रुपये इतके झाले आहे. दिवाळीत पुन्हा यात दोन ते तीन हजारांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
3. शहरातील आजच्या सोन्याच्या किंमती
मुंबई-पुण्यात आज २४ कॅरेटनुसार प्रति तोळ्यासाठी ५८,५३० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये ५८,५६० रुपये प्रति तोळ्यासाठी मोजावे लागतील. नागपूरमध्ये देखील प्रति तोळ्याला ५८,५३० आज मोजावे लागतील. ठाण्यात आज २४ कॅरेटनुसार प्रति तोळ्यासाठी ५८,५३० रुपये मोजावे लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.