Business Idea: कमी गुंतवणूकीत होईल जास्त फायदा! २० हजारात सुरु करा व्यवसाय, या आहेत 5 बेस्ट आयडिया

Business News: कमीत कमी गुंतवणूक करुन तुम्ही व्यवसाय सुरू करु शकतात.
Business Idea
Business IdeaSaam Tv
Published On

Business Under 20K :

स्वतः चा व्यवसाय सुरू करावा असे अनेकांचे स्वप्न असते. व्यवसाय सुरू करताना मोठ्या प्रमाणात भांडवल आवश्यक असते. अनेकजण त्यामुळेच व्यवसाय सुरू करण्याचे पाऊल उचलत नाही. परंतु आम्ही तुम्हाला आज अशा व्यवसायांची माहिती देणार आहोत ज्यात तुम्ही कमी गुंतवणूकीत चांगला नफा मिळवू शकता.

व्यवसाय सुरू करण्यात रिस्क असते. त्यामुळे अनेकजण व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत नाही. मात्र, तुम्ही अगदी २० हजार रुपयांमध्ये स्वतः चा व्यवसाय सुरू करुन चांगला नफा मिळवू शकता.

Business Idea
FD Investment : Fixed Deposit करा अन् मिळवा रेकॉर्ड ब्रेकिंग व्याज, तुमचं या बँकेत खातं आहे का?

मेणबत्त्या बनवणे

मेणबत्त्यांना नेहमीच मागणी असते. २०,००० पेक्षा कमी खर्चात तुम्ही हा व्यवसाय सुरू करु शकता. सणासुदीच्या काळात मेणबत्त्या किंवा मेणाच्या दिव्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा आहे. मेणबत्त्या या रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये वापरल्या जातात. त्यामुळे तुम्ही कमी खर्चात आणि लहान जागेत हा व्यवसाय सुरू करु शकता.

लोणचे व्यवसाय

लोणचे हे घराघरात खाल्ले जाते. त्यामुळे लोणच्याला बारामाही मागणी असते. घरच्या घरी आणि स्वस्त किंमतीत बनवणारा हा उत्तम पदार्थ आहे. स्त्रिया घरच्या घरी हा व्यवसाय करु शकतात. कमी खर्चात चांगला नफा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे.

कंटेट रायटिंग

सध्या डिजिटल जगात कंटेट रायटिंग खूप महत्त्वाची आहे. अनेक जण लेखणातून भरपूर पैसे कमवतात. त्यामुळे तुम्ही अनेक वेबसाइटसाठी कंटेट रायटिंग करु शकतात. पुरेशी गुंतवणूक करुन तुम्ही हा व्यवसाय सुरू करु शकतात.

बेबी केअर

आजकाल बहुतेक कुटुंबात दोन्ही पालक काम करत असतात. त्यामुळे घरी बाळावर लक्ष ठेवण्यासाठी कोणीच नसते. त्यामुळे त्यांना बाळाची काळजी घेण्यासाठी कोणाची तरी गरज असते. त्यामुळे बेबी केअर हा एक उत्तम व्यवसाय आहे. अनेक जण बेबी केअर केंद्र सुरू करतात. हादेखील एक उत्तम व्यवसाय आहे.

मोबाईल रिपेअरिंग

जर तुमच्याकडे मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस बाबत उत्तम ज्ञान असेल तर तुम्ही मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय सुरू करु शकतात. यात मोठ्या भांडवलाचीही आवश्यकता नाही. तुम्ही २०,००० पेक्षा कमी किमतीत हा व्यवसाय सुरु करु शकतात.

Business Idea
Breast Cancer Awareness Month: ब्रेस्ट कॅन्सर कसा होतो? याची लक्षणे कोणती? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com