Maharashtra Political News : अजित पवार गटाचं X अकाउंट सस्पेंड का झालं?; राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं कनेक्शन उघड

NCP NEWS : NCP speaks1 नावाने अजित पवार गटाचे ट्विटर हॅण्डल आहे.
Ajit Pawar Sharad PAwar
Ajit Pawar Sharad PAwarSaam TV

रुपाली बडवे

NCP News :

राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर  शरद पवार  गट आणि अजित पवार गट वेगळे झाले आहेत. पक्षासोबतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही विभागले गेले आहेत. मात्र आता अजित पवार गटाचं एक्स म्हणजे जुनं ट्विटर अकाऊंट सस्पेंड झालं आहे. ट्विटरने ही कारवाई केली आहे.

अजित पवार गटाचं एक्स अकाऊंट मागील दोन दिवसांपासून सस्पेंड करण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ट्विटरकडून कारवाई ही कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar Sharad PAwar
Fertilizer Price Update : शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढणार? खतांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता

NCP speaks1 नावाने अजित पवार गटाचे ट्विटर हॅण्डल आहे. याबाबत अजित पवार गटाने माहिती देताना म्हटलं की, आपलं म्हणणं ट्विटरला कळवलं असून हे ट्विटर हॅण्डल आज सुरू होईल.

Ajit Pawar Sharad PAwar
Girl Students Vandalise Car : बिहारमध्ये विद्यार्थिनींनी शिक्षण अधिकाऱ्यांची गाडी फोडली; मुलींच्या उद्रेकाचं कारण काय?

नियम उल्लंघन झाल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याने एक्स अकाऊंट सस्पेंड करण्यात आल्याची माहिती आहे. तसा मेसेज देखील अजित पवार गटाच्या ट्विटर अकाऊंटवर दिसत आहे. मात्र नेमकं कारण समोर आलेलं नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com