Fertilizer Price Update : शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढणार? खतांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता

Farmer News Update : मार्केटमधील किमतींप्रमाणे रशियाने खतांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Fertilizer (File Photo)
Fertilizer (File Photo)Saam tv

Farmer News :

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आधीच संकटात आहे. पावसाअभावी पिकं करपू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दुसरीकडे पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. कांदा, टोमॅटो यासारख्या पिकांना भाव मिळत नसल्याने रस्त्यावर माल फेकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे.

आधीच अनेक अडचणींनी घेरलेल्या शेतकऱ्यांना आणखी एका अडचणीचा सामना करावा लागू शकतो. येत्या काळात खतांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण रशियातील कंपन्यांनी डायअमोनियम फॉस्फेटसारखी (DAP) खते भारताला सवलतीच्या दरात देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणार भारतातील खतांच्या किमतीवर होऊ शकतो. (Latest Marathi News)

Fertilizer (File Photo)
Rajashtan Accident : देवदर्शनाची इच्छा अपूर्णच राहिली, राजस्थानमध्ये भीषण बस अपघातात ११ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

मार्केटमधील किमतींप्रमाणे रशियाने खतांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतात खतांच्या किमती वाढू शकतात. याशिवाय चीनने देखील खतांची निर्यात कमी केली आहे.

Fertilizer (File Photo)
Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; बैलपोळ्याच्या दिवशी 'या' जिल्ह्यांमध्ये बरसणार

मागील काही काळात रशियातून भारतात मोठ्या प्रमाणात खतांची आयात झाली होती. मात्र यापुढे सवलतीच्या दरात खत मिळणार नसल्याने भारताला खत खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना देखील वाढीव किमतीत खत खरेदी करावे लागू शकते. सरकार यामध्ये शेतकऱ्यांना काही दिलासा देणार का हे पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com