Rajashtan Accident : देवदर्शनाची इच्छा अपूर्णच राहिली, राजस्थानमध्ये भीषण बस अपघातात ११ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Accident News : बसमध्ये एकूण ६० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे.
Rajsthan Highway Accident
Rajsthan Highway AccidentSaam tv
Published On

Rajasthan News :

राजस्थानमधून भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सहा महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृत गुजरातच्या भावनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Rajsthan Highway Accident
Ganpati Special Trains: गणेशोत्सवासाठी पहिली मेमो ट्रेन दिव्याहून रत्नागिरीकडे रवाना; चाकरमान्यांमध्ये आनंदी आनंद

बसमध्ये एकूण ६० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. बसमधील प्रवासी भावनगरहून मथुरेला दर्शनासाठी जात होते. मात्र भरतपूर-आग्रा महामार्गावर बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला.

चालक आणि त्याचा साथीदारासह इतर प्रवासीही बसमधून उतरले. चालक आणि त्याचे साथीदार बस पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान अचानक एका ट्रकने बसला जोरदार धडक दिली आणि बाजूला उभ्या असलेल्या लोकांना चिरडले. (Accident News)

Rajsthan Highway Accident
Uttar Pradesh Crime News: घरी सोडण्याच्या बहाण्याने शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार; उत्तर प्रदेशात खळबळ

घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत उपस्थितांनी तातडीने मदतीने पोलीस आणि इतर हेल्पलाईन नंबरवर फोन फिरवले. काही वेळातच मदत तिथे पोहोचली. मात्र अपघात इतका भीषण होता की मृतदेह महामार्गावर विखुरले होते.

अपघातानंतर महामार्गावर मोठा चक्का जाम झाला होता. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com