उत्तर प्रदेशच्या सहारपूरमधून खळबळजनक वृत्त हाती आलं आहे. लिप्ट देऊन घरी सोडण्याच्या बहाण्याने शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने ५ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी पीडितेला एका चौकात फेकून फरार झाले.
यानंतर या पीडितीचे माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पीडितेला गाडीत बसवून पोलीस स्टेशनला नेले. या घटनेची माहिती पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली.
एसपी सागर जैन यांनी सांगितले की, 'विद्यार्थिनीच्या काकांनी तक्रार देताना सांगितले की, आसरा खेडी येथील दोन तरुण अंकुर आणि अमन हे मुलीच्या शाळेजवळ पोहोचले. हे तरुण मुलीच्या आत्याच्या गावातील होते. त्यामुळे ती मुलगी त्यांच्यासोबत गेली. मात्र, त्यांनी मुलीला सामसूम जागेवर नेलं. त्याठिकाणी तीन जण आणखी होते. या पाच जणांनी मिळून विद्यार्थिनीवर अत्याचार केले. त्यानंतर या आरोपींनी विद्यार्थिनीला चौकावर ठेऊन फरार झाले.
दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . या घटनेतील आरोपींवर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा नोंद करत त्यांना अटक करण्यात आली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.