पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होऊन मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला, तर बैलपोळ्याच्या सणानिमित्त शेतकऱ्यांना मिळालेला हा मोठा दिलासा मानला जाईल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात आज आणि उद्या बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे.
याशिवाय विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पुढील तीन मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातही वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही तासांत हे वादळ मध्यप्रदेशच्या दिशेने सरकरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आज कोकण गोवा आणि विदर्भात बहुतांश भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भासह अन्य भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून पावसाचा हा जोर वाढणार असल्याचंही हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
पुढील ४८ तासांत विदर्भातील यवतमाळ, वाशिम, गोंदिया, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा, अमरावती अकोला जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पासून पुढील १६ तारखेपर्यंत या जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. तर धुळे, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.