कोमल दामुद्रे
जगात लाखो लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी एक नवीन सूचना जाहीर केली आहे.
२४ ऑक्टोबरनंतर काही फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.
कंपनी नवीन फिचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. ज्यामध्ये सिक्युरिटी सिस्टीमनुसार अॅपमध्ये बदल केले जाणार आहे.
यामुळेच काही जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही.
यामध्ये अॅन्डॉइड आणि आयफोनचादेखील समावेश आहे.
Samsung Galaxy s2, Nexus 7,iPhone 5 , iPhone 5c, Samsung Galaxy Tab 10.1 सह अनेक मोबाईलचा समावेश आहे.
या फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होण्याआधी कंपनी ग्राहकांना नोटिफिकेशन पाठवणार आहे.
वरील फोनमधील टेक्नीकल सपोर्ट या अपडेटला सपोर्ट करणार नाही.
आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार की नाही याबाबतची माहिती व्हॉट्स्अॅपच्या सेटिंग्स मध्ये जाऊन पाहता येईल.