नुकताच व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) एक नवीन फीचर आले आहे. जे अल्पावधितच खूप लोकप्रिय होत आहे. सामान्य लोकांसोबतच अनेक सेलिब्रिटीही मेसेजिंग अॅपवरील 'चॅनल्स'च्या नवीन फीचरमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. व्हॉट्सअॅप चॅनेलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चॅनेलवर तर बॉलिवूड सेलिब्रिटींची हवा पाहायला मिळत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना (Bollywood Celebrity) प्रचंड फॅन फॉलोइंग मिळत आहे. सध्या व्हॉट्सअॅप चॅनलवर (Whatsapp channel) बॉलिवूडची कॅट अर्थात अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) बाजी मारली आहे.
व्हॉट्सअॅपवर काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅप चॅनल्स फीचर सुरू करण्यात आले होते. हे नवं फीचर येताच अनेक सेलिब्रिटींनी आपले व्हॉट्सअॅप चॅनल्स सुरु केले आहेत. या फीचरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जसजसे युजर्स वाढत आहेत तसतसे या सेलिब्रिटींचे फॉलोअर्स देखील वाढत आहेत. अशामध्ये सेलिब्रिटींच्या व्हॉट्सअॅप चॅनलबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना कैफ व्हॉट्सअॅप चॅनलवर फॉलोअर्सच्या बाबतीत नंबर १ ठरली आहे. तिचे १४ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. फॉलोअर्सच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रीने फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गलाही मागे टाकले आहे.
व्हॉट्सअॅप चॅनेलवर हळूहळू बॉलिवूड सेलिब्रिटींचे फॉलोअर्स वाढत चालले आहेत. कतरिना कैफने यामध्ये बाजी जिंकली आहे. त्याने फॉलोअर्सच्या बाबतीत मार्क झुकरबर्ग आणि आंतरराष्ट्रीय रॅपर बॅड बनीला मागे टाकले आहे. सेलिब्रिटींच्या या यादीमध्ये सर्वाधिक फॅन फॉलोइंगच्या बाबतीत, कतरिनानंतर रॅपर बॅड बनी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे फॉलोअर्स १२.६ मिलियन आहेत.
मार्क झुकेरबर्ग हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे ९.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. कतरिनाने १३ सप्टेंबर रोजी व्हॉट्सअॅप चॅनलवर अकाउंट तयार केले होते. कतरिनाने या चॅनलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यासोबतच ब्रँड प्रमोशनशी संबंधित व्हिडीओही शेअर केले आहेत. कतरीनाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, कतरिना कैफ लवकरच सलमान खानसोबत 'टायगर ३' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.