TRP Rating Of Marathi Serial: ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती, TRP मध्ये नंबर १ वर; तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’लाही टाकलं मागे

TRP Rating News: १५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबरपर्यंतचा टीआरपीचा रिपोर्ट समोर आला आहे.
Marathi Serial TRP Rating News
Marathi Serial TRP Rating NewsSaam Tv
Published On

Marathi Serial TRP Rating News

टेलिव्हिजन सिरीयल चॅनेलचा लेटेस्ट TRP रिपोर्ट जाहीर झाला आहे. सप्टेंबरमधील मधल्या आठवड्यातील मालिकेंचा टीआरपी रिपोर्टसमोर आला आहे. टीआरपीच्या खेळामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेने पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. तर त्यानंतर गेल्या आठवड्यात टीआरपी रिपोर्टमध्ये एक नंबरवर असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आलेली आहे.

Marathi Serial TRP Rating News
Lata Mangeshkar Birthday: 'पुढच्या जन्मी मला लता मंगेशकर नाही व्हायचं', असं का म्हणाल्या होत्या गानसम्राज्ञी?

‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाहवर प्रदर्शित झाली होती. प्रदर्शित झाल्यापासून अनेक सिरियल्सला मागे सारत, टीआरपीमध्ये पहिल्या नंबरवर आली आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली असून पती-पत्नीची एक वेगळीच लव्ह स्टोरी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

तर तिसऱ्या क्रमांकापासून पुढे ‘आई कुठे काय करते’, सुख म्हणजे नक्की काय असतं, ठिपक्यांची रांगोळी या अशा मालिका आहेत. तर अकराव्या क्रमांकावर झी मराठीची तुला शिकविनच चांगला धडा ही मालिका आहे. ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेच्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असलेली पाहायला मिळतेय.

हा टीआरपीचा रिपोर्ट १५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर पर्यंतचा आहे. सध्या ठरलं तर मग, प्रेमाची गोष्ट, आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं, ठिपक्यांची रांगोळी या मराठी मालिकांमध्ये जबरदस्त शर्यत पाहायला मिळत आहे. कायमच कोण टीआरपी चार्टमध्ये अव्वल ठरेल, यामध्ये सर्वच प्रयत्नात पाहायला मिळत आहे.

Marathi Serial TRP Rating News
Jigyasa Singh: 'थपकी प्यार की' फेम जिज्ञासा सिंहचं अपघाती निधन?, अफवांनंतर अभिनेत्रीनंच सांगितलं खरं सत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com