प्रसिद्ध टीव्ही मालिका 'थपकी प्यार की' (thapki pyar ki) फेम अभिनेत्री जिज्ञासा सिंगचा (Jigyasa Singh) कार अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. सोशल मीडियावर जिज्ञासा सिंगच्या मृ्त्यूच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सर्व अफवा असल्याची माहिती स्वत: अभिनेत्रीने दिली आहे. अभिनेत्रीने या सर्व अफवांवर पूर्णविराम देत मी जिवंत असल्याचे सांगितले आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
जिज्ञासा सिंग सध्या छोट्या पडद्यापासून दूर असून तिचा ब्रेक टाईम एन्जॉय करत आहे. नुकताच अभिनेत्रीच्या मृत्यूच्या अफवा पसरू लागल्या. या सर्व अफवांमध्ये स्वत: अभिनेत्रीने समोर येत इन्स्टाग्रामवर तिच्या मृत्यूच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. जिज्ञासाने इन्स्टावर काही युट्यूब व्हिडिओंचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या मृत्यूबद्दल खोट्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. अभिनेत्रीने तिच्या मृत्यूची बातमी फेटाळून लावली आहे.
जिज्ञासाने आपल्या मृत्यूच्या अफवा पसरवणाऱ्यांचा निषेध केला आणि आपण जिवंत आणि सुखरूप असल्याचे स्पष्ट केले आहे. तसंच तिने सर्वांना अशा खोट्या बातम्या पसरवणे थांबवण्याचे आवाहन केले. जिज्ञासाने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'हे लोक कोण आहेत जे हे पसरवत आहेत? मित्रांनो, मी जिवंत आहे! चमत्कार चमत्कार! अशा खोट्या बातम्या फेक चॅनेल्सवर पसरवणे थांबवा.'
जिज्ञासाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, 'थपकी अभिनेत्री जिज्ञासा सिंहचे निधन झाले. व्हिडीओमध्ये तिच्या फोटोला हार घातल्याचे दिसत आहे. तसंच व्हिडीओमध्ये रुग्णवाहिका आणि लोकांची मोठी गर्दी झाले असल्याचे देखील दिसत आहे. स्वत:च्याच मृत्यूची बातमी पाहून अभिनेत्री चांगलीच संतापली. शेवटी तिने सोशल मीडियावर पोस्ट करत या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे.
जिज्ञासा सिंहने 'थपकी प्यार की' आणि 'थपकी प्यार की 2' या मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिका कलर्स वाहिनीवर २०१५ मध्ये प्रसारित झाली आणि २०१७ पर्यंत चालली. या मालिकेचे ७०४ एपिसोड होते. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर या मालिकेमध्ये प्राची बन्सलने तिची जागा घेतली. जिज्ञासा व्यतिरिक्त, शोमध्ये आकाश आहुजा, मनीष गोपलानी, नितांशी गोयल, अंकित बाथला, शीना बजाज आणि मोनिका खन्ना मुख्य भूमिकेत होते. या मालिकेशिवाय जिग्यासाने 'शक्ती- अस्तित्व के एहसास की' मध्येही काम केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.