टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद (Actress Urfi Javed) आपल्या हटके आणि अतरंगी स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी फाटके, कधी अर्धवट तर कधी कोणत्याही वस्तूंपासून तयार केलेले ड्रेस घालून उर्फी जावेद ही घराबाहेर पडत असते. या ड्रेसिंग स्टाईलमुळेच उर्फी सोशल मीडियावर चर्चेत राहते. उर्फी जावेद आता पुन्हा चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या नव्या ड्रेसिंग स्टाईलमुळे. यावेळी उर्फीने अंग प्रदर्शन केले नाही. पण तिने जो काही ड्रेस घातला आहे त्यामुळे ती ट्रोल होत आहे.
उर्फी जावेद यावेळी हँगरसकट कोट घालून घराबाहेर पडली. अभिनेत्री यावेळी 'मिस्टर इंडिया'झाली होती. उर्फीने पिंक कलरचा कोट आणि पँट परिधान केली होती. या ड्रेसिंग स्टाईलमध्ये उर्फी नेमकी कुठे आहे हेच दिसत नव्हते. उर्फीचा चेहरा देखील व्यवस्थित दिसत नव्हता. एखाद्या बुजगावण्यासारखं उर्फी रस्त्यावर फिरत होती. उर्फी जावेदचे या ड्रेसिंग स्टाईलमधील फोटो आणि व्हिडीओ (Urfi Javed Video) सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिला आता ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
उर्फी जावेदला ढगळा कोट आणि पँटमुळे व्यवस्थित चालता देखील येत नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. उर्फी जावेदची ही हटके ड्रेसिंग स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडत आहे तर दुसरीकडे तिला ट्रोल देखील केले जात आहे. उर्फी जावेदचा ड्रेस पाहून एका यूजरने लिहिले की, 'खुलीच्या मुलांची कपडे चोरली.' दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, 'मध्यरात्री असे कपडे घालून बाहेर जाऊ नको.' तर तिसऱ्या युजरने लिहिलं की, 'आमच्या शेतामध्ये पक्षांना पळवण्यासाठी अशीच बुजगावणं लावतात.' तर आणखी एका युजरने लिहिलं की, 'चालता फिरता हँगर'
उर्फी जावेदची तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील तिच्या प्रत्येक ड्रेसिंग स्टाईलमुळे तिला ट्रोल करण्यात आले. त्याचपद्धतीने तिला धमक्या देखील आल्या. तरी देखील उर्फी आपल्या फॅशनचा जलवा दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. ती दररोज नवनवीन क्रिएटिव्ह ड्रेस घालून घराबाहेर पडताना दिसते. उर्फीला या ट्रोलिंगचा काहीच फरक पडत नाही. तिने अनेकदा ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देखील दिलं आहे. उर्फी टीव्ही मालिका आणि शोमध्ये जरी दिसत नसली तरी देखील ती लाइमलाइटमध्ये राहते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.