Kiran Mane News: किरण मानेंची शेतकऱ्यांच्या सद्यपरिस्थितीवर भाष्य करणारी पोस्ट चर्चेत, थेट शिवरायांच्या पत्राचा दिला दाखला

Kiran Mane Post: शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीवर भाष्य करणारी किरण मानेंनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे भीषण वास्तव पोस्टच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
Kiran Mane News
Kiran Mane NewsFacebook
Published On

Kiran Mane News

टेलिव्हिजन अभिनेता किरण माने कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मध्यंतरी त्यांनी एक अलिशान कार घेतल्यानंतर तुफान चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे ते चर्चेत आले आहेत. कायमच सोशल मीडियावर राजकीय, मनोरंजन किंवा सामाजिक विश्वातील घडामोडीवर ते कायमच आपलं परखड मत मांडण्याचा प्रयत्न करत असतात. किरण मानेंनी आज सोशल मीडियावर नुकतीच शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीवर भाष्य करणारी एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे भीषण वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Kiran Mane News
Jawan Poster On Truck: ‘बेटे को हाथ लगाने से पहले...’ ट्रक चालकाला ही जवानची क्रेझ, ट्रकवर पोस्टर रेखाटत लिहिला फेमस डायलॉग

किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “तुम्हाला ठावं हाय का? शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदरानं कर्ज देणारे पहिले राज्यकर्ते कोण होते? आपले छत्रपती शिवाजी महाराज ! महाराजांचं नाव आजकाल फक्त धर्माच्या अंगानं सोयिस्कररित्या पुढं आणलं जातं. सगळ्या सिनेमातनंबी फक्त मुघलांशी झालेल्या लढाईच्या कथा रंगवून दाखवल्या जातात. त्यातनं महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातली नव्वद टक्के बाजू लपवून ठेवून, प्रेक्षकांमध्ये नको ती एनर्जी ठासून भरली जाते. शिवरायांना ‘महान’ तर म्हनायचं, त्यांचा जयजयकार तर करायचा...पण रयतेच्या हिताचे निर्णय घेणारा, सर्व जातीधर्मांचा आदर करणारा, समता आनि मानवताधर्म जपणारा ‘जाणता राजा’ जानूनबुजून दुर्लक्षित ठेवायचा. मग अशा परिस्थितीत 'शेतकर्‍यांची मनापास्नं काळजी घेनारा' हा राजा तुमच्यापर्यन्त ते कसा पोचू देतील?”

पुढे पोस्टमध्ये किरण माने म्हणतात, “आजच्या घडीला आपण भयान दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. पडला तर तिच्यायला अस्सा मुसळधार पडतोय, का हाय नाय ते सगळं धुवून नेतोय... आन् नाय पडला तर पाक वाळून, करपून राखरांगोळी हुतीय... शिवरायांना अतीप्रिय असलेल्या शेतकऱ्याचं आज लै लै लै बेक्कार हाल चाल्लेत. महिनाभरापुर्वी आमचं शुटिंग एका शेताजवळ चाललंवतं. तिथं पावसानं ओढ दिल्यामुळं शेतकरी स्प्रिंकलरनं सोयाबीनला पानी द्यायचे. पन लाईट सारखी जायची यायची. चोवीस तासात अर्धा गुंठाबी रान भिजायचं नाय. रात्री-अपरात्री कमरेएवढ्या वाढलेल्या पिकातनं, पायात सळसळनार्‍या जनावरांची पर्वा न करता, जीवावर उदार होऊन फिरनारे शेतकरी मी बघितलेत... लै जीव कासावीस व्हायचा बघून.”

Kiran Mane News
Parineeti Dedicates Songs To Raghav: लग्नानंतर परिणीती चोप्राने नवऱ्याला दिलं मोठं गिफ्ट, राघव चड्ढासाठी गायलं स्पेशल गाणं

पुढे किरण माने म्हणतात, “खरंतर हे भयाण वास्तव न्युज चॅनलवरनं रोज समोर आलं पायजे. पन कोन उठून कुठल्या पक्षाच्या वळचनीला गेला, कुनाच्या मागं इडी लागलीय... कुना नेत्याची सेक्स क्लीप सापडली, कुनाची खुर्ची धोक्यात हाय... कुनी किती आमदार किती खोके मोजून इकत घेतले... ह्यातनं आपलं महाराष्ट्राचं राजकारण बाहेरच पडंना ह्येज्यायला... ह्या गदारोळात वरडून वरडून दुष्काळाची पूर्वकल्पना देनारे आवाज बसले... जगाच्या पोशिंद्याचे डोळे पांढरे व्हायची येळ आली. शेतकरी आत्महत्या वाढल्या. 'इलेक्शन' डोळ्याफुडं ठिवुन घोडेबाजारात रमलेले नेते दुष्काळासाठी उपाययोजना आन् तयारी करायचंच इसरून गेलेत ! बसा बोंबलत. बरं आपण आपल्याच सरकारला हक्कानं सोशल मिडीयावरनं जाब इचारावा, तर लगी ट्रोल पिलावळीची जुनी पाक चोथा झालेली कॅशेट सुरू, ‘पूर्वीच्या सरकारनं काय केलं...’ ”

Kiran Mane News
Pushpa The Rule OTT Rights: प्रदर्शनाआधीच ‘पुष्पा २: द रुल’चे स्ट्रीमिंग राईट्स विकले, अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

मग आपन म्हणणार, “ते बिनकामाचे होते म्हनून तुम्हाला आणलं ना? तुम्ही काय केलं?” ह्या भांडणात मूळ विषय आन् आमचा शेतकरी परत बाजूला पडणार... असो. तर छ. शिवरायांनी आपल्या सरदारांना लिहीलेलं एक पत्र वाचलं मी परवा. त्यात त्यांनी काही गोष्टींबद्दल सक्त आदेश दिलेत ! लै लै लैच भारी पत्र हाय ते... शिवरायांच्या नांवावर राजकारन करनार्‍या आपल्या राज्यकर्त्यांपर्यंत ते पोहोचावं आन् 'राजांचा आदेश' समजून त्यांनीबी कामाला लागावं, हा माझा उद्देश... छ. शिवराय सांगतात, “गावोगाव फिरा. शेतकर्‍यांच्या बैठका घ्या. त्यांची मायेनं विचारपूस करा. पेरणीला आवश्यक बियाणे, मनुष्यबळ नसेल, औतकाठी नसेल, बैल-बारदाणा नसेल तर तो सगळा त्याला पुरवा. त्याच्या सगळ्या अडचणींचे जातीने निराकरण करा. त्याला जगायलाही धान्य पुरवा. नवे पिक आले की, त्याच्याकडून कर्जाची रक्कम त्याच्या कलाकलाने (हप्त्याहप्त्याने) वसूल करा. फक्त मुद्दल तेवढे घ्या. व्याज माफ करा. कर्जफेडीसाठी त्याच्यावर जोर जबरदस्ती करू नका. शेतकरी खुश राहिल, आनंदी असेल याची काळजी घ्या. शेतकरी जगला तर स्वराज्य जगेल.”

Kiran Mane News
Nushrratt Bharuccha: 'अजूनही मोठ्या सिनेमाची वाट पाहतेय', १७ वर्षांनंतरही नुसरत भरुचाचा संघर्ष सुरूच

पोस्टच्या शेवटच्या भागात किरण माने म्हणतात, “काय बोलू? वाचताना डोळे पाणावले... अक्षरं धूसर झाली... 'राजा' असा असतो भावांनो ! आपले गुरू संत तुकोबारायांनी सांगीतलेल्या "आर्तभुतांप्रती । उत्तम योजाव्या त्या शक्ती ।।" या वचनाचे तंतोतंत पालन करून राज्य करनार्‍या माझ्या लाडक्या राजाला मानाचा मुजरा ! जय शिवराय.”

Kiran Mane News
Akshara And Adhipati Haldi Photos: अक्षराच्या आणि अधिपतीची लगीनघाई; मालिकेच्या सेटवरुन हळदीचे फोटो आले समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com