Jawan Poster On Truck: ‘बेटे को हाथ लगाने से पहले...’ ट्रक चालकाला ही जवानची क्रेझ, ट्रकवर पोस्टर रेखाटत लिहिला फेमस डायलॉग
Jawan Poster On Truck
शाहरुख खान आणि नयनताराच्या ‘जवान’ची आजही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई सुरु आहे. नुकतंच चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवस झाले असून चित्रपटाची अद्याप क्रेझ संपलेली नाही. सध्या सोशल मीडियावर अनेक नेटकरी चित्रपटातील गाण्यांवर रिल्स बनवून शेअर करताना दिसत आहेत. अशातच एका पठ्ठ्याने थेट चित्रपटाचं पोस्टर आणि चित्रपटातील एक डायलॉग ट्रकच्या मागच्या बाजूला काढला आहे. (Actor)
सध्या सोशल मीडियावर ‘जवान’चा पोस्टर काढलेल्या ट्रकची प्रचंड चर्चा होत आहे. खुद्द शाहरुख खाननेही हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलेला आहे. त्या व्हायरल व्हिडीओत, ‘जवान’चा पोस्टर दिसत आहे. नेटकऱ्यानं या व्हिडीओला कॅप्शन दिलंय की, “एक कल हमारे पीछे है, एक कल हमारे बाद, आज आज की बात करो, आज हमारे साथ.” या व्हायरल व्हिडीओवर शाहरुखनं प्रतिक्रिया दिली आहे. तो व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले की, “हे छान दिसतंय. आता या ट्रकसोबत पंगा घेण्याआधी लोकं दोनदा विचार करतील. हाहा...” (Social Media)
शाहरुखच्या ‘जवान’ने आतापर्यंत भारतात ५७१. २८ कोटी रुपयांचा टप्पा गाठला. जगभरात चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा गाठला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने तब्बल १० चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले होते. चित्रपटाबद्दल बोलायचे तर, विजय सेतुपती, नयनतारा, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, गिरिजा ओक आणि लहर खान यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तर दीपिकाने चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराचं काम केलं आहे. दरम्यान, हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. (Viral Video)
२०२३ मधील शाहरुखचे एकूण तीन चित्रपट प्रदर्शित होणार होते. जानेवारीमध्ये ‘पठान’, सप्टेंबरमध्ये ‘जवान’ तर येत्या डिसेंबरमध्ये ‘डंकी’ प्रदर्शित होणार आहे. इतर चित्रपटांप्रमाणे हा देखील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट असून प्रेक्षकांना सध्या, शाहरुखच्या डंकी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. डंकी मध्ये आता शाहरुखसोबत आणखी कोणकोणते कलाकार काम करणार? हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत. (Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.