Jailer Movie News: 'जेलर' चित्रपटात फक्त बॉलिवूड नव्हे, तर या इंड्रस्ट्रीतील कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका; जाणून घ्या कोण आहेत हे कलाकार?

Jailer movie News : सध्या रजनीकांतच्या 'जेलर' चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटात रजनीकांत, शिवा राजकुमार, तमन्‍ना भाटिया, मोहनलाल अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
Jailer movie
Jailer movie Instagram
Published On

Jailer movie News: सध्या रजनीकांतच्या 'जेलर' चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटात रजनीकांत, शिवा राजकुमार, तमन्‍ना भाटिया, मोहनलाल अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सर्वच इंड्रस्ट्रीतील दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहे. (Latest Marathi News)

रजनीकांतच्या 'जेलर' चित्रपट जवळच्‍या पीव्‍हीआर आयनॉक्‍स सिनेमागृहांमध्‍ये आजपासून चित्रपट पाहण्‍याचा आनंद घेऊ शकतात. हा चित्रपट प्रदर्शित होण्‍यापूर्वी या चित्रपटामधील स्‍टार कलाकारांची माहिती जाणून घेऊया!

Jailer movie
Chinmay Mandlekar No Selfie Policy : चिन्मय मांडलेकरची शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी 'नो सेल्फी पॉलिसी'; म्हणाला देशाचे पंतप्रधान आले तरी...

1. रजनीकांत - तमिळ सिनेमा

पाच दशकांहून अधिक काळ कारकीर्द असलेले रजनीकांत हे निश्चितच तमिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आहेत. त्यांनी तेलुगू, बंगाली आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. रजनीकांत यांनी आगामी चित्रपट 'जेलर' मुथुवेल पंडियनची भूमिका साकारली आहे आणि ते आपल्‍या अद्वितीय अभिनय कौशल्‍यांसह निश्चितच चित्रपटाचा स्‍तर नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याची अपेक्षा आहे.

2. शिवा राजकुमार - कन्‍नड सिनेमा

विविध भारतीय भाषांमध्ये तीन दशकांहून अधिक काळ काम करण्‍यासह शिवा राजकुमार यांनी १२५ हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपट 'जेलर'च्‍या माध्‍यमातून ते तमिळमध्ये पदार्पण करत आहेत. रजनीकांत यांच्यासोबतचा त्‍यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. रिपोर्टसनुसार, शिवा राजकुमार या चित्रपटात मुख्य खलनायकाच्‍या भूमिकेत दिसणार आहेत.

3. मोहनलाल - मल्‍याळम सिनेमा

रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'जेलर'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी मल्याळम चित्रपटसृष्‍टीतील सुप्रसिद्ध सुपरस्टार मोहनलाल यांची निवड करण्यात आली आहे. सूत्रांनुसार, मोहनलाल या चित्रपटात एक खास कॅमिओ साकारणार आहेत.

4. सुनिल - तेलुगू फिल्‍म्‍स

तेलुगू चित्रपटांमध्ये आपल्‍या सनसनाटी अभिनयासाठी प्रसिद्ध प्रतिभावान अभिनेते सुनिल यांना रजनीकांत यांच्या थ्रिलर चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी निवडण्यात आले आहे.

चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये अभिनेता रेट्रो लूकमध्ये दिसला होता. सुनिल कोणती भूमिका साकारणार आहेत, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, पण लवकरच त्‍यांच्‍या भूमिकेबाबत अधिक माहिती मिळेल.

Jailer movie
Yaariyan 2 Teaser: अ‍ॅक्शन-ड्रामासह उलगडणार नवी नाती; 'सनी सनी' गाण्याच्या नवीन व्हर्जनसह 'यारिया 2'चं टीझर प्रदर्शित

5. जॅकी श्रॉफ - हिंदी सिनेमा

जॅकी श्रॉफ ३६ वर्षांनंतर चित्रपट 'जेलर'मध्ये रजनीकांतसोबत पुन्हा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात ते खलनायकाची भूमिका साकारण्‍यासह जेलरची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.

आपल्या चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत, जॅकी यांनी १३ भाषांमधील २२० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत आणि ते खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतातील स्टार अभिनेता आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com