Chinmay Mandlekar No Selfie Policy : चिन्मय मांडलेकरची शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी 'नो सेल्फी पॉलिसी'; म्हणाला देशाचे पंतप्रधान आले तरी...

Chinmay Mandlekar On His Historic Character : चिन्मयने शिवाजी महाराजांच्या भूमिकेविषयी बोलताना चिन्मय मांडलेकरने आपले मत मांडले आहे.
Chinmay Mandlekar
Chinmay MandlekarSaam Tv
Published On

Subhedar Movie Film Interview

खणकर आवाज, रुबाबदार व्यक्तीमत्त्व असलेला मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. चिन्मय मांडलेकर अभिनेत्यासोबतच लेखक आणि दिग्दर्शकाच्या भूमिका लिलया पेलतो.

अनेक चित्रपटात चिन्मयने वेगवेगळी पात्र साकारली आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी चिन्मय प्रसिद्ध आहे. चिन्मय मांडलेकर लवकरच 'सुभेदार' या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Chinmay Mandlekar
Rohit Raut Debut In Acting: रोहित राऊतचे अभिनयात पदार्पण, लवकरच दिसणार मालिकेत

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव मुखी येताच आपसुकच अंगावर शहारे आणि तोंडातून जय येतच. शिवाजी महाराजांची भूमिका करणे, भूमिका करताना त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. याच भूमिकेविषयी बोलताना चिन्मय मांडलेकरने आपले मत मांडले आहे.

सुभेदार (Subhedar Movie) चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच सुभेदारचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरनंतर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सिंहगडावर जाऊन तानाजी मालुसरेंच्या स्मृतीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर एका प्रमोशनच्या कार्यक्रमात मी सेल्फी काढत नाही असे वक्तव्य केले आहे.

Chinmay Mandlekar
Actress Left Tu Chal Pudha: 'तू चाल पुढं' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट; व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण

नुकतच प्रमोशनदरम्यान एका वाहिनीशी चिन्मय मांडलेकरने संवाद साधला. 'मी शिवरायांच्या पूर्ण पोशाखात असतो. जेव्हा जिरेटोपही चढवतो. त्यानंतर माझा तुम्हाला एकही सेल्फी मिळणार नाही. म्हणजे अगदी देशाचा पंतप्रधान जरी आले तरीही नाही. याचं कारण असं की, जेव्हा मी शिवरायंचा पूर्ण पोशाख घालतो, तेव्हा मी शिवरायांच्या भूमिकेत असतो.आणि त्यांचा मान राखला गेला पाहिजे.

आजपर्यंत म्हणजे आजतागायत कोणालाही त्या पोशाखात मी कधीच फोटो दिला नाही. बरेचदा लोकांचा हिरमोड होतो. पण तरीही मी त्यांना सांगतो की माझी तळमळ समजून घ्या .पण तुम्हाला सेल्फी मिळणार नाही. एकदा का! त्या भूमिकेत शिरलं त्या वेशामध्ये गेलं की अनेक गोष्टींचे तारतम्य तुम्ही कसे वागता सेटवर,तुम्हा कसं तुमचं आचरण तुमच्या सहकलाकारांसोबत किंवा इतरांसोबत ठेवता यावरुन कळतं.

अनेकदा आम्ही बाहेर शुटिंग करतो. बरेच लोक शुटिंग बघायला आलेले असतात. त्यामुळे ते भान तुम्हाला बाळगाव लागतं. त्यामुळे माझा नियम एकच आहे की, तुम्ही छत्रपती शिवाजी महराजांचा पूर्ण पोशाख केला की त्यांचा आब राखला गेला पाहिजे'. असं चिन्मय मांडलेकर म्हणाला.

चिन्मय मांडलेकरची छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असताना नो सेल्फी पॉलिसी आहे. शिवरायांचा मान राखण्यासाठी चिन्मय मांडलेकरचा हा नियम आहे. यावरुनच चिन्मय मांडलेकर ना फक्त भूमिकेत महाराजांचे गुण अंगाशी बाळगत तर तो खऱ्या आयुष्यातही महाराजांचा खूप आदर करतो.

'आधीलगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं' म्हणत कोंढाण्यावर चढाई करणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'सुभेदार' चित्रपटात चिन्मय मांडलेकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com