Unknown Facts In Ranbir Kapoor
Unknown Facts In Ranbir Kapoor Saam Tv

Happy Birthday Ranbir Kapoor : रणबीर कपूरबाबत १० इंटरेस्टिंग गोष्टी, प्रत्येक फॅनला माहित पाहिजेत

Ranbir Kapoor News: बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयचा आज ४१ वा वाढदिवस, अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्याबाबत १० इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहेत.
Published on

Happy Birthday Ranbir Kapoor

रणबीर कपूरची ओळख सांगायची तर ऋषी कपूर यांचा एकुलता एक. पण त्याने अभिनयामध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. रणबीरचा जन्म २८ सप्टेंबर १९८२ मध्ये झाला, तो आज आपला ४१ वा वाढदिवस साजरा करीत आहे. चॉकलेट बॉय म्हणून सर्वत्र प्रकाशझोतात राहिलेल्या रणबीरने २००७ मध्ये, ‘सावरिया’ मधून फिल्मी करिअरला सुरुवात केली. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला माहित नसलेल्या १० गोष्टी सांगणार आहोत...

Unknown Facts In Ranbir Kapoor
Kiran Mane News: किरण मानेंची शेतकऱ्यांच्या सद्यपरिस्थितीवर भाष्य करणारी पोस्ट चर्चेत, थेट शिवरायांच्या पत्राचा दिला दाखला
  • रणबीर कपूर एक चांगला अभिनेता असून तो एक चांगला डान्सर देखील आहे. त्या सोबतच रणबीरने जॅझ आणि बॅलेचे प्रशिक्षणही घेतले आहे. बहुआयामी असलेल्या रणबीरने डिक्शन आणि घोडेस्वारीतही आपले नशीब आजमावले.

  • रणबीर कपूर एक चांगला अभिनेता तर आहेच, पण यासोबतच तो ‘तबला’ही उत्तम वाजवतो. याशिवाय रणबीरने ‘रॉकस्टार’मधील आपल्या खास भूमिकेकरीता गिटारही वाजवायला शिकला.

  • रणबीर कपूरने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली सिनेकारकिर्द वडील ऋषी कपूर यांच्या १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम ग्रंथ’ चित्रपटातून सुरुवात केली.

  • रणबीर कपूरसाठी अयान मुखर्जी नेहमीच लकी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याच्यासोबत केलेले सर्व चित्रपट सुपरहिट ठरले. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेकअप सिड’ या चित्रपटासाठी रणबीर आणि अयानची जोडी पहिल्यांदाच एकत्र आली होती.

  • रणबीर कपूर किती फुटबॉलप्रेमी आहे हे आपण अनेकदा पाहिले आहे. पण, काही मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूर त्याच्या फ्री टाईममध्ये मोबाईलवर कँडी क्रश गेम खेळताना दिसतो.

  • रणबीर कपूरने न्यूयॉर्कमध्ये ॲक्टिंगचा आणि डायरेक्शनचा कोर्स केला होता. त्याने तिकडे जवळपास ३०० शॉर्टफिल्म बनवल्या होत्या. पण त्याला तिथे न आवडल्यामुळे तो भारतात परतला.

Unknown Facts In Ranbir Kapoor
Jawan Poster On Truck: ‘बेटे को हाथ लगाने से पहले...’ ट्रक चालकाला ही जवानची क्रेझ, ट्रकवर पोस्टर रेखाटत लिहिला फेमस डायलॉग
  • रणबीर कपूर हा कपूर कुटुंबातील पहिला पुरुष सदस्य आहे, ज्याने दहावीनंतर पुढे आपले शिक्षण पूर्ण केले.

  • मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूरला Nasal Deviated Septum नावाचा आजार आहे. या आजारामुळे माणूस खूप जलद बोलतो आणि खातो.

  • रणबीर कपूरला आत्मचरित्र (Auto Biography) वाचायला आवडते. रणबीरला ‘हेवीअर दॅन हेवन’ हे पुस्तक वाचायला फार आवडते.

  • अभिनेता रणबीर कपूर फारच फुडी क्रेझी असून त्याला अनेक चमचमीत पदार्थ खायला आवडतात.

Unknown Facts In Ranbir Kapoor
Parineeti Dedicates Songs To Raghav: लग्नानंतर परिणीती चोप्राने नवऱ्याला दिलं मोठं गिफ्ट, राघव चड्ढासाठी गायलं स्पेशल गाणं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com