'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आज आपल्यामध्ये नाहीत. पण हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. लता मंगेशकर या सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध गायिका होत्या. त्यांचे स्थान कोणीच घेऊन शकले नाही. मोठमोठे संगीतकार त्यांच्यासोबत काम करण्यासाठी वाट पाहायचे. पण अनेकांची इच्छा अपूर्ण राहिली. फक्त भारतामध्येच नाही तर परदेशामध्ये देखील लता मंगेशकर यांचा मोठा चाहता वर्ग होता. आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी दखील त्यांनी गायलेल्या गाण्याच्या माध्यमातून त्या आजही करोडो चाहत्यांच्या हृदयामध्ये जिवंत आहेत
लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत ३६ भारतीय भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली होती. लता मंगेशकर यांनी फक्त हिंदी भाषेतील १००० पेक्षा जास्त गाण्यांना आपला आवाज दिला होता. तर त्यांनी ३६ भाषांमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. आज लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त (Lata Mangeshkar Birth Anniversary) आपण गायिकेच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत...
लता मंगेशकर यांना आपल्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला होता. ते ऐकल्यानंतर तुम्ही सर्वजण आश्चर्यचकित व्हाल. अशामध्ये लता मंगेशकर यांनीच 'मला पुढच्या जन्मामध्ये लता मंगेशकर व्हायचे नाही' असे सांगितले होते. एका मुलाखतीदरम्यान त्यांना पुढच्या जन्मामध्ये काय व्हायचे आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी हे उत्तर दिलं होतं. त्यावर त्यांना पण असं का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी हसत हसत सांगितले होते की, 'लता मंगेशकरांच्या समस्या फक्त त्यांनाच माहीत आहेत.'
लता मंगेशकर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच काही बोलाच्या नाहीत. त्यांना होणारा त्रास आणि त्यांच्या समस्या या त्यांनाच माहिती होत्या. लता मंगेशकरांच्या या उत्तरामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. दरम्यान, लता मंगेशकर यांनी लग्न केलं नव्हतं. लता मंगेशकर यांचं एका व्यक्तीवर प्रेम होतं पण त्यांची प्रेमकहाणी अपूर्ण राहिली होती. त्यामुळेच त्यांनी लग्न केलं नव्हतं असं म्हटले जात होते. पण लता मंगेशकर यांनी नेहमी लग्न न करण्यामागचे कारण घरची जबाबदारी असे सांगितले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लता मंगेशकर यांचे डुंगरपूर राजघराण्याचे महाराज राज सिंह यांच्यावर खूप प्रेम होते. महाराजा राज सिंह हे लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचेही खूप चांगले मित्र होते. सामान्य कुटुंबातील कोणत्याही मुलीशी लग्न करणार नाही असं वचन राजाने आपल्या आई-वडिलांना दिले होते. याच कारणामुळे त्यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत लग्न केले नव्हते असे सांगितले जाते. लता मंगेशकर यांची गाणी ऐकण्यासाठी महाराज राज सिंह हे स्वत:सोबत टेप रेकॉर्डर घेऊन फिरायचे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.