Skin Care Tips Yandex
लाईफस्टाईल

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी मध ठरतोय गुणकारी, फक्त 'अशा' पद्धतीने करा वापर

Golden Glowing Skin Using Honey: मधाचा वापर करून जेल,लिप बाम, मॉइश्चरायझर, आणि क्लिंजिंग मिल्कसारखी उत्पादने तयार केली जातात. तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये मधाचा समावेश करून निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवू शकता.

Rohini Gudaghe

How To Get Golden Glowing Skin

मध केवळ आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. मधाचा रोज वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील डाग दूर करू शकता. मधामध्ये अनेक प्रकारचे शक्तिशाली संयुगे (Skin Care Tips) आढळतात, ते त्वचेला आतून चमकदार ठेवण्यास मदत करतात. अनेक शतकांपासून मधाचा घरगुती उपचारांमध्ये वापरत होत आहे. (latest skin tips)

अनेक कॉस्मेटिक उत्पादने बनवण्यासाठी देखील मधाचा वापर केला जातो. मधामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. ते त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्याचे काम करतात. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. त्यामुळे ते चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत (Skin Care) करतात.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मधामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ग्लुकोज, कार्बोहायड्रेट्स आणि एन्झाइम्स भरपूर प्रमाणात असतात. याचा वापर विशेषतः त्वचेच्या उपचारांमध्ये केला जातो. मधाचा वापर करून जेल, मॉइश्चरायझर,(Golden Glowing Skin Tips) लिप बाम आणि क्लिंजिंग मिल्कसारखी उत्पादने तयार केली जातात. स्किन केअर रूटीनमध्ये जर मधाचा समावेश केला तर त्वचा निरोगी आणि चमकदार होते.

मधाचा फेस स्क्रब

तुम्ही घरच्या घरी मधाचा फेस स्क्रब तयार करू शकता. मधाचा फेस स्क्रब तयार करण्यासाठी, साखर आणि कॉफी वापरा. साखर, कॉफी आणि मध या तीन गोष्टी एकत्र करा. कॉफीमुळे रक्ताभिसरण (Honey) वाढते, साखर मृत पेशींपासून मुक्त होण्यास मदत करते. हा पॅक तयार करण्यासाठी एका भांड्यात साखर, कॉफी आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने मसाज करा. आठवड्यातून एकदा या स्क्रबने चेहरा स्वच्छ करा.

काकडी आणि मधाचे मास्क

काकडीमध्ये मध मिसळून तुम्ही घरी नैसर्गिक फेस मास्क तयार करू (Honey Pack) शकता. यामुळे तुमचा चेहरा एखाद्या पार्लर ट्रिटमेंटसारखा चमकेल. याचा वापर केल्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डागांपासून सहज सुटका करू शकता.

हनी पेस पॅक

जर तुम्हाला कोरड्या त्वचेचा त्रास होत असेल तर मधाचा वापर करा. मधामध्ये असणारे गुणधर्म असतात त्वचेला नैसर्गिकरित्या दीर्घकाळ मॉइश्चरायझ ठेवतात. मधाच्या वापराने त्वचा निरोगी, (How To Get Golden Glowing Skin) मुलायम आणि चमकदार राहते. हा पॅक करण्यासाठी एका भांड्यात दूध, हळद, मध आणि ग्लिसरीन मिसळा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे राहू द्या. यानंतर चेहरा पाण्याने धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा लावा. तुमची त्वचा लवकरच चमकदार दिसू लागेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: ठाकरे गट व भाजपच्या कार्यकर्त्यात धाराशिव पंचायत समिती कार्यालयात तुफान राडा

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Dementia Risk: ३५ ते ४५ वयात ह्रदयविकाराचा झटका आल्यावर वाढतो मेंदूचा आजार? नक्की खरं काय? रिसर्च काय सांगतं?

Maharashtra ZP elections : झेडपी, महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार? डिसेंबर-जानेवारीमध्ये मतदानाची शक्यता |VIDEO

SCROLL FOR NEXT