Skin Care Tips: उन्हामुळे त्वचेची चमक कमी झालीये? कॉफीचा फेस मास्क ट्राय करा, चेहरा दिसेल तजेलदार

Beauty Tips : उन्हाळा सुरु झाली की, सूर्याच्या किरणांमुळे आपल्या त्वचेची अधिक हानी पोहोचते. सनस्क्रीन लावून देखील त्वचेची योग्य प्रमाणात काळजी घेत नसू तर त्वचेचे तेज कमी होते.
Skin Care Tips, Beauty Tips
Skin Care Tips, Beauty TipsSaam tv
Published On

Coffee Face Mask :

उन्हाळा सुरु झाली की, सूर्याच्या किरणांमुळे आपल्या त्वचेची अधिक हानी पोहोचते. सनस्क्रीन लावून देखील त्वचेची योग्य प्रमाणात काळजी घेत नसू तर त्वचेचे तेज कमी होते.

वाढते प्रदूषण, सतत स्क्रीन टाइमचा वापर आणि धुळीमुळे चेहऱ्याचे अतिप्रमाणात नुकसान होते. अनेकदा चेहऱ्यावर आपण केमिकलयुक्त पदार्थांचा वापर करतो ज्यामुळे आपल्या त्वचेचे (Skin) नुकसान होते. पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करुन देखील त्वचेची चमक पुन्हा येत नाही. जर तुम्हालाही अधिकचे पैसे खर्च करायचे नसतील तर स्वयंपाकघरात असणाऱ्या कॉफी (Coffee) पावडरचा वापर तुम्ही करु शकता. याचा वापर कसा करायचा जाणून घेऊया.

1. कॉफी आणि हळदी पावडर फेस मास्क

कॉफीमध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि दोन चमचे दूध मिसळा. ही पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा. २० ते २५ मिनिटे राहू द्या. नंतर थंड पाण्याने (Water) चेहरा स्वच्छ धुवा. हळदीमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म चेहऱ्यावरील डाग घालवण्यास मदत करतात.

Skin Care Tips, Beauty Tips
Makeup Sins : मेकअप करताना या ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, त्वचेला होणार नाही नुकसान

2. कॉफी आणि कोरफड

दोन चमचा कोरफड जेलमध्ये एक चमचा कॉफी पावडर मिसळा. त्यात थोडे दूध मिसळून चेहऱ्याला लावा. कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. कॉफी आणि कोरफडच्या मदतीने ब्लॅक हेड्स दूर होतात. कॉफीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म चेहऱ्यावर आतून पोषण देऊन सुंदर करतात.

Skin Care Tips, Beauty Tips
Parenting Tips : पालकांनो, या कारणांमुळे मुलांना करावा लागतो डिप्रेशनचा सामना; लक्षणे दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला

3. कॉफी आणि बेसन

दोन चमचे कॉफी पावडरमध्ये तीन चमचे बेसन, कोरफड जेल आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा. या फेस मास्कच्या मदतीने चेहरा सुंदर दिसेल. तसेच मृत पेशी निघून जाण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com