Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचा ड्राय-तेलकट का होते? कशी घ्याल काळजी?

How To Care Your Skin In Summer Season : उन्हाळा सुरु झाला असून सूर्याच्या किरणांमुळे आपल्या त्वचेला अधिक हानी पोहोचते. चेहऱ्याची कितीही काळजी घेतली तरी मुरुमे आणि डाग यांच्या समस्येला सामोरे जावे लागते.
Skin Care Tips, How To Care Your Skin In Summer Season
Skin Care Tips, How To Care Your Skin In Summer SeasonSaam Tv

Summer Skin Care Tips :

उन्हाळा सुरु झाला असून सूर्याच्या किरणांमुळे आपल्या त्वचेला अधिक हानी पोहोचते. चेहऱ्याची कितीही काळजी घेतली तरी मुरुमे आणि डाग यांच्या समस्येला सामोरे जावे लागते.

उन्हाळ्यात सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचा (Skin) कोरडी तर होतेच शिवाय अनेक प्रकारे हानीही होते. उन्हाळ्यात आपण त्वचेची काळजी (Care) घ्यायला हवी. याकाळात अधिकतर त्वचा कोरडी किंवा तेलकट होते. त्यामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागते.

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांचे कारण सूर्याची अतिनील किरणे. कडक उन्हात जर तुम्ही बाहेर पडत असाल तर त्वचेवर उष्णतेमुळे पुरळ येऊ शकतात. ज्या लोकांची त्वचा अधिक संवेदनशील आहे किंवा ऍलर्जीची समस्या असणाऱ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, त्वचारोग किंवा एक्जिमासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी काळजी कशी घ्याल जाणून घेऊया

Skin Care Tips, How To Care Your Skin In Summer Season
Skin Care Tips : उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, पिंपल्स आणि रिंकल्सच्या समस्येपासून मिळेल कायमची सुटका

1. एलोवेरा जेल

अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफड गुणकारी मानले जाते. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफड फायदेशीर आहे. त्वचेला लागणारी खाज, डाग आणि जळजळ दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. त्वचेवर याचा जेल लावल्याने फायदा (Benefits) होतो.

2. खोबऱ्याचे तेल

खोबऱ्याच्या तेलाचे काही थेंब टी ट्री ऑइलमध्ये मिसळून लावल्याने त्वचेसाठी खूप फायदा होतो. हे त्वचेला लावा आणि काहीवेळाने स्वच्छ धुवा.

Skin Care Tips, How To Care Your Skin In Summer Season
Uric Acid Disease : बटाटे खाल्ल्याने शरीरातील युरिक अ‍ॅसिड वाढते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

3. मेथी दाण्याचे पाणी

त्वचेच्या कोणत्याही समस्येमुळे ऍलर्जी होत असले तर मेथी दाण्याचे पाणी खूप फायदेशीर ठरु शकते. याचे पाणी उकळवून आंघोळ करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com