कोमल दामुद्रे
युरिक अॅसिड वाढल्याने शरीरात अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. आजकाल युरिक अॅसिड वाढण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.
जर तुमच्या शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढली तर किडनीच्या आजाराचा धोका वाढतो.
अनेकांना असे वाटते की, बटाटे खाल्ल्याने युरिक अॅसिड वाढते. खरे काय जाणून घेऊया तज्ज्ञांकडून
एम्समधील आहारातज्ज्ञ डॉ. परमजीत कौर सांगतात की, बटाटे खाल्ल्याने युरिक अॅसिड वाढत नाही. बटाट्यामध्ये फार कमी प्रमाणात प्युरीटन असते.
बटाटे हे फायबर आणि जीवनसत्त्वे यांचा चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे संधिवात होण्याची किंवा युरिक अॅसिडची पातळी वाढण्याची शक्यता नसते.
बटाटे पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहे, जो युरिक अॅसिडच्या समस्येने ग्रस्त लोकांसाठी महत्त्वपूर्ण इलेक्ट्रोलाइट आहे.
बटाटे हे मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे. जे यूरिक अॅसिड असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे.