कोमल दामुद्रे
आयुष्यात अशी अनेक नाती असतात जी आपण स्वत:निवडत नाही. पण मैत्रीचे नाते हे आपण स्वत: निवडतो.
आपल्या आयुष्यात किती मित्र आहेत हे महत्त्वाचे नाहीत, ते कसे आहेत हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नेहमी योग्य मित्राची निवड करा.
खोट्या मित्रांपेक्षा शत्रू चांगला असतो हे अनेकदा ऐकायला मिळते. कारण त्यांना नेहमी आपल्या चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट झालेले अधिक आवडतात. त्यामुळे असे मित्र आयुष्यात ठेवू नका.
खरे मित्र तेच असतात जे तुम्हाला क्वचित भेटतात. काहीही झाले तरी कठीण प्रसंगात तुम्हाला पाठींबा देतात.
खरा मित्र तोच जो तुमच्या पाठीमागे तुमचे वाईट ऐकू शकत नाही. तसेच कोणालाही तुमच्या बद्दल वाईट बोलू देत नाही.
खरा मित्र नेहमी तुमच्या विचारांचा आदर करतो. तसेच चुकीच्या गोष्टींना चुक ठरवण्याची हिंमत करतो.
खरा मित्र कधीच तुम्हाला चुकीच्या मार्गाला जाऊ देत नाही. तुम्हाला पाठींबा देण्याऐवजी ते तुमचे काय चुकते हे समजावून सांगतात.