Health Tips: रोगप्रतिकार शक्ती वाढवायचीये? 'या' पदार्थांचं करा सेवन, आजारांपासून होईल संरक्षण

Immunity Boost : बदलत्या हवामानामुळेमध्ये फ्लूचा संसर्ग वाढतांना दिसतो. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे या रोगांचा धोका शरीराला होण्याची शक्यता भरपूर अस्ते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये लहानमुलं अनेक आजारांना बळी पडतात.
Immunity Boost
Immunity BoostYandex
Published On

Foods for Immunity :

बदलत्या ऋतूमुळे खोकला, सर्दी, फ्लूसारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका अधिक असतो.आजारांची लागण होऊ नये यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आहारात काही पोषक खाद्यपदार्थांचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे आजारांपासून बचाव होईल. आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे आपण जाणून घेऊ..(Latest News)

बदलत्या हवामानामुळेमध्ये फ्लूचा संसर्ग वाढतांना दिसतो. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे या रोगांचा धोका शरीराला होण्याची शक्यता भरपूर अस्ते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये लहानमुलं अनेक आजारांना बळी पडतात. म्हणूनच लहान मुलांबद्दल खूप सावधगिरी बाळगावी लागते त्याचं कारण म्हणजे त्यांची कमकुवत रोगप्रतिकार शक्ती.

संत्री, लिंबू, आवळा या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी शरीराला आजारांशी लढण्यास मदत करते, ज्यामुळे फ्लू आणि खोकला होत नाही. ब्रोकोलीमध्ये अनेक जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन ए, सी आणि ई सोबतच सल्फर कंपाऊंड्स आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. व्हिटॅमिन सी आणि सल्फर शरीराताल रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. याशिवाय यामध्ये फायबर आढळते ज्यामुळे रक्तातील साखर आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आयुर्वेदात हळदीचे औषधी गुणधर्मांसाठी कौतुक केले जाते. त्यात कर्क्यूमिन नावाचं घटक आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. याशिवाय त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहेत.

टीप - ही माहिती साधारण माहिती सुचनेसाठी आहे. कोणत्याही पदार्थांचा आणि औषधांचा अवलंब करण्याआधी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Immunity Boost
Diabetes Care: यंदा मधुमेहाच्या रुग्णांसाठी होळीचा सण होईल आणखीनच गोड, फक्त ट्राय करा या 'स्पेशल डिश'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com