Diabetes Care: यंदा मधुमेहाच्या रुग्णांसाठी होळीचा सण होईल आणखीनच गोड, फक्त ट्राय करा या 'स्पेशल डिश'

Diabetes Care in Holi: होळी सणानिमित्ताने आता घरोघरी गोड पदार्थ बनतील.परंतु या काळात मधुमेहाच्या रूग्णांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
Diabetes Care
Diabetes CareSaam Tv

Health Tips Diabetes Diet

सामान्य दिवस असो किंवा इतर कोणताही सण. मधुमेह असलेल्या रुग्णांना काहीही खाण्यापूर्वी विचार करावा लागतो. सण-उत्सवामध्ये घरीच पदार्थ बनवले जातात. या काळात थोडासा निष्काळजीपणा रक्तातील साखरेची पातळी बिघडवू (Diabetes Care in Holi) शकतो. त्यामुळे तब्येत बिघडू शकते. सण-उत्सवात मधुमेही रुग्णांनी स्वत:ची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.

मोहिनी डोंगरे या वरिष्ठ आहारतज्ज्ञ म्हणतात की, होळीचा सण (Health Tips) रंग आणि चविष्ट पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. होळीच्या (Holi) सणामध्ये अनेक प्रकारचे गोड पदार्थ घरोघरी तयार केले जातात. सण-उत्सवात तुमच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी मधुमेही रुग्णांनी गोड पदार्थांऐवजी रक्तातील साखर नियंत्रित करणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश करावा, अशी माहिती त्यांनी टीव्हीनाईन हिंदीला दिली आहे.

Diabetes Care
Dombivli Day Care Centre : पाळणाघरातील धक्कादायक प्रकार; चिमुकल्या मुलांना बांधून लाकडीपट्टीने मारहाण, घटना कॅमेरात कैद

फ्रूट चाट आणि पनीर

ज्येष्ठ आहारतज्ञ डॉ. मोहिनी डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुमेहाच्या रुग्णांसाठी गोड पदार्थांऐवजी फ्रूट चाट किंवा खजूरचे एअर फ्राइड गुजिया हा अतिशय चांगला पर्याय (Diabetes Care) आहे. याशिवाय प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट समृध्द नट्स हे देखील होळीच्या वेळी चवीनुसार आणि आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे.

पनीरमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतो, त्यामुळे ते देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी आरोग्यदायी अन्न आहे. या व्यतिरिक्त गोड स्नॅक्सऐवजी बेरीज् देखील वापरता येईल, असं त्यांनी सांगितलं (Diabetes Care in Holi) आहे.

कडधान्यांची चाट

मधुमेही रुग्णही कडधान्यांची चाट खाऊ शकतात. यामध्ये उकडलेले पांढरे हरभरे वापरून चाट तयार केली जाते. यात तेलाचे प्रमाणही खूप कमी असते. मधुमेह असलेल्या रूग्णांसाठी तो एक हेल्दी डाएट (Diabetes Care) आहे. सणासुदीच्या काळात आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे गोड आणि तेलकट पदार्थांऐवजी सुरक्षित पदार्थ निवडा जेणेकरून तुमचे आरोग्य चांगले राहील.

अशा प्रकारे मधुमेह असलेल्या रूग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यांनी आपल्या आहारामध्ये गोड पदार्थांचा कमीत कमी वापर करावा. तसंच जास्त तेलकट खाणेही टाळावे. आता काही दिवसातच सण येत आहे. त्या काळात आपल्या आहाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

Diabetes Care
Holi Hair Care : होळीच्या रंगांपासून करा केसांच संरक्षण, खोबऱ्याच्या तेलात मिसळवा हे २ पदार्थ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com