कोमल दामुद्रे
यंदा होळीचा सण हा २५ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.
होळी खेळताना काही गोष्टीची काळजी घ्यायला हवी. ज्यामुळे त्वचेसोबत केसांचे नुकसान होणार नाही.
होळीच्या रंगात अनेक रासायनिक घटक असतात. ज्यामुळे आपल्या त्वचेला आणि केसांना खूप नुकसान होते.
तुम्ही देखील यंदा होळी खेळायला जात असाल तर खोबऱ्याच्या तेलात काही पदार्थ मिसळून लावल्यास केसांचे नुकसान होणार नाही.
होळीच्या दिवशी खोबऱ्याच्या तेलात कोरफड जेल मिसळून केसांना लावा. यामुळे केसांना कोणतेही नुकसान होणार नाही.
खोबऱ्याच्या तेलात लिंबाचे २-३ थेंब मिसळून वापरु शकता. ज्यामुळे केसांवर याचा परिणाम होणार नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.