रोजच्या धावपळीच्या जीवनामुळे प्रत्येक नागरिक दररोज नवनवीन लोकांशी कनेक्ट होत असतो. त्याबरोबरच सर्वांनाच प्रत्येकाच्या आयुष्यात स्पेशल बनायचं असतं. त्यामुळे त्या व्यक्तीसोबत आपली बॅाडिंग खूप छान तयार होते. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या भावना नीट समजून घेता. तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात तुमची एक नवीन जागा निर्माण होत असते. म्हणून लोकांना स्वत:शी अॅटरॅक्ट करण्यासाठी तुमच्या जीवनात या टिप्स फॅालो करा.
प्रत्येकाला आपल्यासारखे बनवा
प्रत्येकाला तुमच्यासारखे बनवण्यासाठी सर्वात आधी समोरच्या व्यक्तीला समजून घ्या. त्याबरोबर सर्वांशी कनेक्ट होण्याचे ट्राय करत राहा. प्रत्येकाला आपले मत मांडण्याची जागा द्या. अशा ट्रिक्स जीवनात फॉलो केल्याने लोक तुमच्यासारखे बनण्याचे ट्राय करतील.
आरशात उभे राहून बोलणे
आपण रोज स्वत:ला आरशात पाहत असतो. आरशात स्वत:ला दररोज पाहिल्याने आपल्याला स्वत:ची वागणूक समजत असते. आपल्या वागणूकीवरुन आपण लोकांशी कसे बोलायचे , कसे वागायचे या सर्व गोष्टी समजत असतात. त्यामुळे लोकांना स्वत:शी अॅटरॅक्ट करुन घेण्यासाठी त्यांच्याशी नीट बोलण्याचा प्रयत्न करत राहा.
समोरच्या व्यक्तीला सहानुभूती दाखवा
जर एखादी व्यक्ती तुम्हाला काही सांगत असेल तर ते नीट काळजी पूर्वक ऐका. काळजी पुर्वक ऐकून झाल्यावर त्या व्यक्तीला त्या संबंधात मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर सहानुभुती आणि समजून घेण्यास समर्थ राहा. या सर्व गोष्टी केल्याने त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल आपलेपणा निर्माण होईल.
समोरच्या व्यक्तीचा सल्ला घ्या
जर तुम्ही एका ग्रुप डिसक्शनमध्ये आपले विचार सांगत असाल तर मोठ्यापासून लहानांपर्यत सर्वांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. समोरच्या व्यक्तीचे मत जाणून घेतल्यास त्यांना आपोआप तुमची किंमत समजत असते. त्या व्यक्तीच्या मनात तुमच्या बद्दल एक आदर निर्माण होत असतो. त्याबरोबर त्यांच्या सल्ल्याने अजून नवनवीन गोष्टी समजत असतात. म्हणून समोरच्या व्यक्तीच्यां सल्यानां नेहमी समजून घ्या.
कॉम्प्लिमेंट करणे
एखाद्या व्यक्तीची प्रंशसा केल्याने त्यांना खूप चांगले वाटत असते. म्हणून समोरच्या व्यकतीच्या चांगल्या गुणांबद्दल नेहमी प्रंशसा करत राहा. त्यांना सर्व गोष्टींसाठी एनकरेज करत राहा. हे सर्व करताना एखाद्या व्यक्तीचा जर आत्मविश्वास कमी असेल तर त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत राहा.
Edited by: Sakshi Jadhav