नवरा आणि बायको लग्नानंतर संपुर्ण आयुष्य एकत्र काढतात. हा संसार करताना त्यांच्यात वाद हा होणारचं. मात्र हा वाद नाते तुटण्यापर्यंत जावू शकतो. त्यासाठी आपण वेळीच तोडगा काढला पाहिजे. दोन डोकी एकत्र असली तर दोन वेगवेगळ्या ईच्छा , आवडी, स्वभाव या गोष्टी समजून घेणे महत्वाचे आहे. त्यात आपापसात भांडण झाले ते सोडवणे सुद्धा महत्वाचे ठरते. मात्र कधीकधी या वादामुळे बरीच नाती तुटतात. ही नाती तुटू नये म्हणून वापरा या खास टिप्स.
तुम्ही कधीही दुसऱ्यांचा राग आपल्या बायको किंवा पार्टनरवर काढू नका. त्याची तुम्हाला सवय लागू शकते. आणि मग समोरच्या व्यक्तीला तुमचा प्रंचड राग येवू शकतो. त्याचसोबत तुम्ही विनाकारण भांडू नका. कधीकधी आपण लहान कारणांवरुन भांडण करतो त्यामुळे समोरची व्यक्ती आपल्यासोबत बोलणं टाळते. याचा परिणाम आपल्या नात्यावर होतो. जोडीदारासोबत तुम्ही भावनिक नाते घट्ट जोडले पाहिजे. त्याने कधीच एकटेपणा निर्माण होत नाही.
सोबत मन हलके होते. याने नात्यात छान मैत्री होते. कधीच आपल्या जोडीदाराला गृहीत धरु नका. ही व्यक्ती आपलीच आहे हा समज नात्यात ठेवू नका. त्याने आपण एकमेकांनकडे दुर्लक्ष करतो. नात्याला महत्व देणं कमी करतो. त्याने आपले नाते तुटू शकते. प्रत्येकाने नात्यात समजुतदारपणा ठेवला पाहिजे.
सोबत नात्यात जास्त संभाषण ठेवले पाहिजे. बऱ्याच वेळेस बोलून गोष्टी मिटवता येतात.त्याने नाते घट्ट टिकून राहते. कुंटुब चालवताना पैश्यांची चणचण जाणवते. त्यावेळेस आपल्या पार्टनरला आपण समजून घेतले पाहिजे. पैसा हा आज आहे तर उद्या नाही मात्र माणुस हाच आपल्या आयुष्यात कायम राहणारा असतो. वाईट काळात आपण एकमेकांनासाथ दिली पाहिजे.