Shravan Special  SAAM TV
लाईफस्टाईल

Shravan Special : श्रावण सोमवारी नैवेद्य होईल खास; झटपट बनवा साबुदाणा रबडी, वाचा सिंपल रेसिपी

Sabudana Rabdi Recipe : सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे. या श्रावणी सोमवारला नैवेद्यासाठी झटपट साबुदाणा रबडी बनवा. सिंपल रेसिपी नोट करा.

Shreya Maskar

श्रावणात सणासुदीचे वातावरण पाहायला मिळते. श्रावण हा सणांचा महिना आहे आणि सण म्हटलं की, उपवास आले. तर श्रावण सोमवारी उपवासाला आणि देवाला नैवेद्य म्हणून काय करायचे? हा प्रश्न अनेक लोकांना पडतो. उपवासाला मोठ्या प्रमाणात खाल्ले जाणारा साबुदाणा हा बेस्ट ऑप्शन आहे. मात्र या वेळी साबुदाण्याची खिचडी किंवा वडे न बनवता. घरीच सिंपल पद्धतीने नैवेद्यासाठी साबुदाणा रबडी बनवा.

तुम्ही साबुदाणा रबडी उपवासाची स्वीट डिश म्हणून देखील खाऊ शकता. हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडेल. तुम्हाला उपवासात पोटाला थंडावा मिळेल. श्रावणात महादेवाची मनोभावे पूजा करून व्रत केले जाते. साबुदाणा रबडी बनवताना आपण फळांचा वापर करतो. श्रावणात ही फळे आपली पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे झटपट गोड,थंडगार साबुदाणा रबडीची रेसिपी जाणून घ्या.

साहित्य

  • साबुदाणा

  • दूध

  • साखर

  • फळे - केळी, सफरचंद , डाळिंब, चेरी

  • सुकामेवा

  • फ्रेश क्रीम

  • केशर

  • गुलाबाच्या पाकळ्या

कृती

साबुदाणा रबडी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक ते दोन तास साबुदाणाी भिजवत ठेवा. तसेच दुसरीकडे एका भांड्यात दूध उकळायला ठेवा. दुधाला छान उकळी आल्यावर साबुदाणा गाळून दुधात घाला. हे मिश्रण मंद आचेवर गॅस ठेवून ढवळत रहा. आता आवडीनुसार साखर घालून मिश्रण छान ढवळून घ्या. आता श्रावणात उपवासाला पौष्टिक असलेला फळे त्यात घाला. त्यासाठी तुम्हाला आधी केळी, सफरचंद , चेरीचे बारीक तुकडे करून घ्या. फ्रेश क्रीम घालून सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्या. आता हे मिश्रण काही तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. थंड झाल्यावर साबुदाणा रबडीची चव आणखी वाढेल. साबुदाणा रबडीचा सर्व्ह करताना त्यावर चेरी, डाळिंब, गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT